ISRO ने पीएसएलव्ही सी ५८ च्या साह्याने XPOSAT उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण सोमवारी केले. या द्वारे कृष्ण विवर, न्यूट्रॉन तारे, दीर्घिकेची केंद्रे यांच्या अभ्यास इस्रोची टीम करणार आहे. चांद्रयान ३, आदित्य एल १ नंतर सहा महिन्यांमध्ये अवकाशात पाठवण्यात आलेली एक्स्पोसॅट ही तिसरी खगोलशास्त्रीय मोहीम आहे.
(1 / 8)
इस्रोने नव्या वर्षात इतिहास घडवला आहे, सोमवारी C58 मिशन- PSLV-C58 च्या साह्याने पहिला X-Ray Polarimeter Satellite, XPoSatचे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. (ISRO)
(2 / 8)
'एक्स्पोसॅट'चे प्रक्षेपण हे आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवण स्पेस सेंटर वरुन सकाळी ९.१० वाजता प्रक्षेपण करण्यात आले. XPoSat ला ६५० किमीच्या पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आले आहे. (ISRO)
(3 / 8)
'एक्स्पोसॅट'चे उद्दिष्ट अंतराळातील प्रखर क्ष-किरण स्त्रोतांच्या ध्रुवीकरणाचा अभ्यास करणे, या द्वारे कृष्ण विवर, न्यूट्रॉन तारे, दीर्घिकेची केंद्रे, मॅग्नेटारपर्यंत, XPoSat अंतराळातील विविध गूढ उद्दिष्टांचा अभ्यास करणार आहे. (ISRO)
(4 / 8)
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी XPoSat च्या इच्छित कक्षेत यशस्वी प्रस्थापित केल्याची घोषणा केली. तसेच मोहिमेची माहिती दिली. (ISRO)
(5 / 8)
'एक्स्पोसॅट'उपग्रहाच्या प्राथमिक पेलोडमध्ये POLIX (X-Rays मधील Polarimeter Instrument) आणि XSPECT (क्ष-किरण स्पेक्ट्रोस्कोपी आणि टाइमिंग) यांचा समावेश आहे, याची निर्मिती रमण संशोधन संस्था आणि UR राव सॅटेलाइट सेंटर, बेंगळुरू यांनी केली आहे.(ISRO)
(6 / 8)
'एक्स्पोसॅट'चे मोहीम ही अंदाजे पाच वर्ष चालणार आहे. एस सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, उपग्रहाचे सोलर पॅनेल उघडले असून त्याचा प्रवास सुरू झाला आहे. (ISRO)
(7 / 8)
मिशन डायरेक्टर जयकुमार एम यांनी 60 व्या PSLV प्रक्षेपणाचे महत्त्व विषाद केले, POEM 3 प्रयोगामध्ये इंधन, सिलिकॉन-आधारित उच्च-ऊर्जा बॅटरी आणि रेडिओ उपग्रह सेवेसह नवीन तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. (ISRO)
(8 / 8)
या मोहिमेने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिला सक्षमीकरणाला देखील इस्रोने महत्व दिले आहे. या मोहिमेत महिलांच मोहट सहभाग आहे. सहा महिन्यांमध्ये अवकाशात पाठवण्यात आलेली एक्स्पोसॅट ही भारताची तिसरी खगोलशास्त्रीय मोहीम आहे.(ISRO)