मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS: IPL मध्ये १० कोटींहून अधिकची बोली; पण वर्ल्डकपमधून डच्चू, याचं कारण काय?

PHOTOS: IPL मध्ये १० कोटींहून अधिकची बोली; पण वर्ल्डकपमधून डच्चू, याचं कारण काय?

22 September 2022, 20:25 IST Rohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
22 September 2022, 20:25 IST

Team india for for t20 world cup: T20 विश्वचषकासाठी सर्व संघांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात परतले आहेत. युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि फिरकी अष्टपैलू दीपक हुडा यांनीही १५ सदस्यीय भारतीय संघात स्थान मिळवले आहे. मात्र, या संघात आयपीएलच्या मेगा लिलावात करोडो रुपयांना विकले गेलेल्या अनेक खेळाडूंना स्थान मिळाले नाही. यामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश आहे.

इशान किशनची फलंदाजी आपल्या सर्वांना माहिती आहे. आक्रमक फलंदाजी हे या यष्टिरक्षक फलंदाजाचे वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला इशानने चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला विश्वचषक संघाचा भाग मानले जात होते. २४ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने १९ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३१ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ५४३ धावा केल्या आहेत. पण काही गोष्टी झारखंडच्या या यष्टीरक्षक फलंदाजाच्या विरोधात गेल्या.

(1 / 11)

IPL २०२२ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी इशान अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. मेगा लिलावात मुंबईने ईशानला १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. टीम इंडियाकडे केएल राहुलच्या रूपाने एक चांगला सलामीवीर आहे. अशा स्थितीत इशान बॅकअप यष्टिरक्षक म्हणून टीम इंडियामध्ये सामील होऊ शकला असता पण दिनेश कार्तिकने ही जागा बळकावली.

(2 / 11)

दीपक चहर हा नवीन चेंडूने जादू दाखवणारा गोलंदाज आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पॉवरप्लेदरम्यान दीपक चहरची गोलंदाजी पाहण्यासारखी असते. दीपक चहरचे वैशिष्ट्य म्हणजे गरज पडल्यास तो खालच्या क्रमांकावर धावाही करू शकतो. 

(3 / 11)

IPL २०२२ मेगा लिलावात दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्जने १५ कोटी रुपयांना विकत घेतले. मात्र, हा दीपक दुखापतीमुळे या वर्षातील बहुतांश काळ संघाबाहेर राहिला. ३० वर्षीय दीपक चहर गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट २०२२ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर संघात होता. दीपकला यावर्षी अनेक सामने खेळता आले नाहीत, जे त्याच्या विरोधात गेले. अशा परिस्थितीत हर्षल पटेलने ही संधी साधली आणि स्विंग गोलंदाज म्हणून भारताच्या १५ सदस्यीय T20 विश्वचषक संघात स्थान मिळवले. मात्र, दीपक चहरला विश्वचषकातील स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे.

(4 / 11)

श्रेयस अय्यर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. श्रेयस २०२२ च्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. विशेषत: श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली. आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयसला कोलकाता नाईट रायडर्सने १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. श्रेयसने आयपीएल २०२२ मध्ये १४ सामन्यात ४०१ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३४ पेक्षा जास्त होता. 

(5 / 11)

श्रेयस टी-२० विश्वचषकाच्या संघात आपले स्थान निर्माण करेल असे वाटत होते. मात्र, दीपक हुडाने मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. दीपक हुडाने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वताला सिद्ध केले. हुडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो फलंदाजीबरोबरच फिरकी गोलंदाजीही करू शकतो. तसेच, तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार आहे. हुडाची ही खासियत पाहून निवडकर्त्यांनी त्याला श्रेयसपेक्षा अधिक प्राधान्य दिले. मात्र, श्रेयस अय्यर स्टँडबाय खेळाडू म्हणून संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.

(6 / 11)

शार्दुल ठाकूर गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक २०२१ मध्ये टीम इंडियाचा भाग होता. सामन्याच्या कोणत्याही परिस्थितीत विकेट मिळवून देण्याची क्षमता शार्दुलमध्ये आहे. याशिवाय त्याच्याकडे  बॅटने धावांचा पाऊस पाडण्याची क्षमताही आहे. दिल्ली कॅपिटल्सने शार्दुलला IPL मेगा लिलावात १०.७५ कोटींमध्ये खरेदी केले होते. आयपीएलच्या १४ व्या मोसमात त्याने ४ सामन्यात १५ विकेट घेतल्या होत्या.

(7 / 11)

३० वर्षीय शार्दुल ठाकूरची ओळख गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणून आहे. मात्र, शार्दुल यापूर्वी मिळालेल्या संधींचा फायदा घेऊ शकला नाही. अशा परिस्थितीत हर्षल पटेलचा टी-20 विश्वचषकासाठी संघात समावेश करण्यात आला, ज्याची टी-20 क्रिकेटमधील अलीकडची कामगिरी चांगली आहे.

(8 / 11)

वेगवान गोलंदाज आवेश खानचा आयपीएल २०२२ चा हंगाम उत्कृष्ट होता. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना आवेशने १३ सामन्यात १८ विकेट घेतल्या. तो सातत्याने १४० च्या स्पीडने गोलंदाजी करु शकतो. आवेश याआधी टी-२० विश्वचषकासाठीच्या प्लॅनमध्ये होता. पण नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात त्याची गोलंदाजी सुमार दर्जाची राहिली. तो अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करु शकला नाही.

(9 / 11)

आयपीएलच्या १४ व्या मोसमात लखनौ फ्रँचायझीने आवेशला १० कोटींमध्ये खरेदी केले होते. टी वर्ल्डकपच्या संघात त्याची स्पर्धा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसोबत होती. मात्र डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीपने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात अर्शदीपची कामगिरी प्रशंसनीय होती, त्यामुळे टी-२० विश्वचषकाचे तिकीट मिळवण्यात तो यशस्वी ठरला.

(10 / 11)

team india

(11 / 11)

team india(all photo- instagram)

इतर गॅलरीज