नात्यात एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सुरुवातीपासूनच अनेक गोष्टींबद्दल स्पष्ट असणे गरजेचं असतं. "रिलेशनशीपमध्ये हे प्रश्न स्वत:ला विचारा. जर तुम्हाला तुमची उत्तरे आवडली नाहीत तर याचा अर्थ असा नाही की नाते तुटले आहे. पण आता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या समस्यांकडे लक्ष देणं आणि हे पॅटर्न बदलायला सुरुवात करणं गरजेचं आहे," असे रिलेशनशिप एक्सपर्ट रॉस विझियानो यांनी सांगितले.
नातं कसं असावं याची चर्चा करायला हवी. नात्यातून आपल्याला काय हवे आहे हे समजून घेतल्यास आपल्याला आपली अनुकूलता निर्धारित करण्यात मदत होऊ शकते.
(Unsplash)विश्वास हा आनंदी आणि सुरक्षित नात्याचा एक मूलभूत घटक आहे. आपण आपल्या जोडीदारावर किती विश्वास ठेवू शकतो याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
अडचणींवर यशस्वीपणे आणि निरोगी पद्धतीने मात करता येते का, हे पाहावे लागेल. आपण ज्या प्रकारे संघर्ष हाताळतो ते आपल्याबद्दल बरेच काही सांगून जाते.
(Unsplash)आपल्याला आपली मूल्ये आणि विश्वास प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले जाते. आपण आपल्या विद्यमान मूल्ये आणि नैतिकतेबद्दल आपल्या जोडीदाराशी चर्चा करणे आवश्यक आहे.