शिव ठाकरे याचे नाव गेल्या काही काळापासून अभिनेत्री डेझी शाह हिच्यासोबत जोडले जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. ‘खतरों के खिलाडी १३’ या शोमध्ये शिव ठाकरे आणि डेजी शाह एकत्र दिसले होते.
शोदरम्यान शिव आणि डेजीची बाँडिंग पाहून त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकंच नाही, तर दोघे अनेकदा एकत्र लंच किंवा डिनर करताना दिसले आहेत. दोघेही नेहमी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असे म्हणताना दिसले आहेत. आता शिवने भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये यावर खुलेपणाने चर्चा केली आहे.
यावेळी शिव म्हणाला की, डेझी त्याची चांगली मैत्रीण आहे आणि ती पुढेही त्याची चांगली मैत्रीणच राहील. आमच्यात तसे काहीही नव्हते. तुम्ही कधी कुणासोबत कॅफेमध्ये गेलात, तर तुम्हीही एकमेकांकडे बघून हसालच ना... हे बघून लगेच लोक नाती जोडू लागतात.
याआधी जेव्हा डेझी शाहला या दोघांच्या नात्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा देखील ती म्हणाली होती की, 'या सर्व अफवांचा आमच्या मैत्रीवर काहीही परिणाम होत नाही. बरं, आमची मैत्री पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाली आहे.’