अनेकांना सकाळी उठल्यानंतर चणे खाण्याची सवय असते. तर अेक जण चालता फिरता फुटाणे खातात. मात्र हे चणे गरोदर महिलांसाठी फायदेशीर आहे की हानिकारक? या संदर्भात काही माहिती समोर आली आहे. अनेक अहवाल सांगतात की चणे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
हरभऱ्यामध्ये कॅलरी, प्रथिने, फॅट, कार्ब, फायबर, मॅंगनीज, तांबे, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासह अनेक पोषक घटक असतात. गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चणे खाण्यास सांगितले जाते. रिपोर्ट्सनुसार गर्भवती महिलांसाठी चणे किती फायदेशीर आहेत ते पाहूया
अॅनिमिया दूर करते - अनेक महिला अॅनिमियाच्या समस्येने त्रस्त असतात. त्यामुळे अॅनिमियाची समस्या असलेल्या अनेक गर्भवती महिलांसाठी हरभरा फायदेशीर आहे. १०० ग्रॅम हरभऱ्यामध्ये २० टक्के लोह असते. जे आई आणि मूल दोघांसाठीही फायदेशीर आहे.
(Unsplash)बाळाच्या मेंदूचा विकास- बाळाच्या मेंदूच्या योग्य विकासासाठी हा कालावधी लक्षात घेता चणे खाण्याचे फायदे आहेत. तसेच हे बाळाच्या मणक्याच्या विकासासाठी खूप फायदेशीर आहे.
रक्तातील साखरेची पातळी- गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवण्यासाठी आहारात चणे ठेवा. गरोदर महिलांसाठी चणे हे अनेक प्रकारे फायदेशीर अन्न मानले जाते. हे उर्जेसाठी देखील फायदेशीर आहेत.
इतर फायदे - असे म्हटले जाते की, चणे फायबरचा चांगला स्रोत आहेत. परिणामी बद्धकोष्ठता असेल तर चणे खाणे फायदेशीर ठरते. चणे गर्भाच्या विकासात मदत करतात.
(wallpaperflare)चणे कोणी खाऊ नये - अतिसाराचा त्रास असलेल्या मातांनी चणे खाऊ नयेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हरभऱ्याची एलर्जी असेल तर ते न खाणे चांगले. गरोदरपणात चणे खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होण्याची शक्यता असल्यास, ते न खाणे चांगले.