GT vs CSK IPL Final 2023 : गुजरात टायटन्सला धूळ चारत चेन्नई सुपरकिंग्जने पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.
(1 / 5)
Gujarat Titans vs Chennai Super Kings : चेन्नई सुपरकिंग्जने अखेरच्या चेंडूवर गुजरातचा पराभव करत आयपीएलचा किताब पाचव्यांदा जिंकला आहे.(AFP)
(2 / 5)
सामना सुरू असताना सतत पाऊस होत होता. परंतु चाहत्यांचा उत्साह काही कमी झाला नाही. धोनीला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आले होते.(AFP)
(3 / 5)
केवळ मैदानातच नाही तर जिओ सिनेमावरही चाहत्यांनी आयपीएलच्या फायनल मॅचचा आनंद लुटला. जिओ सिनेमावर एकाचवेळी तब्बल ३.२ कोटी लोकांनी लाईव्ह सामना पाहिला.(AFP)
(4 / 5)
गुजरातची फलंदाजी संपल्यानंतर ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या कमी झाली होती. परंतु सीएसकेची फलंदाजी रात्री उशिराने सुरू होऊनही कोट्यवधी प्रेक्षक लाईव्ह सामना पाहत होते.(AFP)
(5 / 5)
यंदाच्या आयपीएलच्या लीग सीरिजमध्ये मध्ये एकूण ७० सामने झाले. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त प्रेक्षकांनी म्हणजेच साडेतीन कोटी लोकांनी लाईव्ह सामना पाहिला. त्यामुळं आता जिओ सिनेमाने एक अनोखा विक्रम नोंदवला आहे.(PTI)