आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात ऋषभ पंत याला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. तो या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
तर सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत श्रेयस अय्यर दुसऱ्या स्थानावर आहे. अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले.
अशा स्थितीत ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या महागड्या खेळाडूंची शैक्षणिक पात्रता काय आहे? म्हणजे ते किती शिकले आहेत, याची माहिती आपण येथे घेणार आहोत.
ऋषभ पंत : मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतने बीकॉमची पदवी घेतली आहे. पंत याने दिल्ली विद्यापीठाच्या व्यंकटेश्वर महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे.
श्रेयस अय्यर : तर श्रेयस अय्यरकडेही बीकॉमची पदवी आहे. अय्यर याने मुंबईच्या आरए पोद्दार कॉलेजमधून बी.कॉम केले आहे.