(1 / 6)डेव्हन कॉनवेला चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या आयपीएल लिलावात ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. कॉनवे दुखापतीमुळे आयपीएल २०२४ मध्ये मैदानात उतरला नव्हता. मात्र, कॉनवेने आयपीएल २०२२ मध्ये ७ सामन्यात ४२.०० च्या सरासरीने २५२ धावा केल्या. डेव्हनने आयपीएल 2023 मध्ये 16 सामन्यात 51.69 च्या सरासरीने 672 धावा केल्या. कॉनवेने आयपीएलच्या २३ सामन्यांत ९ अर्धशतके झळकावली आहेत. डेव्हॉन ने फिरकीविरुद्ध सहज धावा केल्या. चेन्नईच्या खेळपट्टीवर कॉनवे किती प्रभावी आहे, हे आधीच समजले आहे. त्यामुळे कॉनवेला संघात घेणे चेन्नईसाठी सकारात्मक ठरू शकते. फोटो: ट्विटर.