आयपीएल संघ पंजाब किंग्सने रिकी पॉंटिंगची हेड कोचपदी निवड केली आहे. रिकी पॉंटिग आधी दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच होता. पण आता पंजाबने पॉंटिंगसोबत मोठ्या रकमेचा करार केल्याचे सांगितले जात आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंसोबत प्रशिक्षकांनाही मोठा पगार दिला जातो.
(1 / 6)

(2 / 6)
आयपीएलमधील सर्वात महागडा प्रशिक्षक गौतम गंभीर असू शकतो. एका वृत्तानुसार, गंभीरला केकेआरकडून २५ कोटी रुपये मानधन मिळाले होते. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
(3 / 6)
गेल्या मोसमात गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा हेड कोच होता. त्यापूर्वी तो लखनऊ सुपर जायंट्ससोबत होता. गंभीरच्या कार्यकाळात लखनौची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. तर केकेआर २०२४ मध्ये चॅम्पियन ठरला.
(4 / 6)
यानंतर मुंबई इंडियन्सने मार्क बाउचर याला २.३ कोटी रुपये पगार दिला आहे. बाऊचर गेल्यावर्षीच संघासोबत जोडला गेला आहे.
(5 / 6)
चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना ३.५ कोटी रुपये मानधन मिळते. फ्लेमिंग बऱ्याच वर्षांपासून CSK सोबत आहे.
(6 / 6)
अँडी फ्लॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून ३.२ कोटी रुपये मिळतात.