(2 / 6)नमन धीर – ५.२५ कोटी (मुंबई इंडियन्स)- नमन धीरला अद्याप आयपीएलमध्ये खेळण्याच्या फारशा संधी मिळालेल्या नाहीत, तरीही मुंबई इंडियन्सने त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. मेगा लिलावात त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि अगदी पंजाब किंग्जनेही त्याच्यामध्ये रस दाखवला, पण मुंबईने सुरुवातीपासूनच या शर्यतीत राहून नमनला ५.२५ कोटींची बोली लावून विकत घेतले.