आयपीएलच्या यंदाच्या अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी क्रिडाविश्वास आपली छाप सोडली आहे.
(ipl 20)पंजाब किंग्जचा फलंदाज शशांक सिंगने शानदार खेळी करत गुजरात टायटन्सला चकित केले. पंजाब किंग्जचा फलंदाज शशांक सिंगने २९ चेंडूत ६१ धावांची सनसनाटी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला, पंजाब किंग्जने त्याला चुकून लिलावात घेतले. मात्र, याच खेळाडूने सर्वांना आश्चर्यचकीत केले.
(ANI)मुंबई इंडियन्सचा खेळाडू नमन धीर पहिल्या दोन सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आणि त्याने २००च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत त्याने संधीचा फायदा घेतला.
(ipl 20)अंगक्रिश रघुवंशीनेही केवळ एका इनिंगने आयपीएल चाहत्यांची मने जिंकली. कोलकाता नाईट रायडर्सकडून या खेळाडूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक झळकावले.
(ipl 20)लखनौ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या वेगाने अव्वल फलंदाजांना चकवा देत आहे. तो सातत्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे. त्याला संघात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
(ipl20)