गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आपले पहिले शतक झळकावले. त्याने ५१ चेंडूत ७ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने १०३ धावा केल्या. या शतकासह त्याने सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाड यांचा संयुक्तविक्रम मोडला.
साई सुदर्शन विक्रम: साई सुदर्शनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएलमध्ये १००० धावांचा टप्पाही गाठला होता. त्याने २५ डावात १०३४ धावा केल्या. यात एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश होता. खेळीच्या बाबतीत, सुदर्शन आयपीएलमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला.
साई सुदर्शन विक्रम : यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनीही ३१ डावात १००० धावा केल्या आहेत. मात्र सई सुदर्शनने अवघ्या २५ डावात हा विक्रम गाठला. टिळक वर्मा ३४ डावांत १००० धावांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
साई सुदर्शन विक्रम: संपूर्ण आयपीएल इतिहासात सर्वात जलद १००० धावा करणारा साई सुदर्शन तिसरा फलंदाज आहे. लेंडल सिमन्सने २३ डावात १००० तर शॉन मार्शने २१ डावात १००० धावा केल्या आहेत. हेडन आणि सुदर्शन या दोघांनी २५ डावांत हा टप्पा गाठला.