आयपीएल २०२४ चा १९ सामना (६ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थानने सहज विजय मिळवला.
(AP)आता या सामन्यानंतर पर्पल कॅप स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या डोक्यावर आहे. राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने बंगलोरविरुद्ध ४ षटके टाकली आणि ३४ धावा देत २ बळी घेतले.
यासह चहलने या मोसमात ४ सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत. तर मोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ४ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत. मुस्तफिजुर रहमान ३ सामन्यांत ७ विकेट्स घेऊन यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
IPL २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
युझवेंद्र चहल – ४ सामन्यात ८ विकेट्स
मोहित शर्मा – ४ सामन्यात ७ विकेट्स
मुस्तफिजुर रहमान – ३ सामन्यात ७ विकेट्स
मयंक यादव - २ सामन्यात ६ विकेट्स
खलील अहमद – ४ सामन्यात ६ विकेट्स
दुसरीकडे, ऑरेंज कॅपच्या बाबतीत विराट कोहली आघाडीवर आहे. विराटने ५ सामन्यात १०५.३३ च्या सरासरीने ३१६ धावा केल्या आहेत. यात त्याने २ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे.
संजू सॅमसन ४ सामन्यात १७८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. हेनरिक क्लासेन ४ सामन्यांत १७७ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत विराट या शर्यतीत खूप पुढे गेला आहे.