मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 Purple and Orange Cap : पर्पल कॅप बुमराहच्या डोक्यावर विराजमान, ऑरेंज कॅपमध्ये विराट-रियान परागमध्ये चुरस

IPL 2024 Purple and Orange Cap : पर्पल कॅप बुमराहच्या डोक्यावर विराजमान, ऑरेंज कॅपमध्ये विराट-रियान परागमध्ये चुरस

Apr 12, 2024 04:36 PM IST Rohit Bibhishan Jetnavare

  • IPL 2024 Orange Cap आणि Purple Cap : आयपीएलमध्ये गुरुवारी मुंबई आणि बंगळुरू यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने सहज विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने २१ धावात ५ विकेट घेतल्या. यानंतर पर्पल कॅप आता बुमराहच्या डोक्यावर विराजमान झाली आहे.

मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने गुरुवारी (११ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध धडाकेबाज कामगिरी केली. त्याने ४ षटकांत २१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यासह बुमराह आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. बुमराहने आतापर्यंत ५ सामन्यांत १० बळी घेतले आहेत. पण बुमराहचा इकॉनॉमी रेट चहलपेक्षा चांगला आहे. बुमराहचा इकॉनॉमी रेट ५.९५ आहे
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

पर्पल कॅपच्या यादीत राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये युझीने आतापर्यंत ५ सामन्यात १० बळी घेतले आहेत. इकॉनॉमी रेट ७.३३ आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

चेन्नई सुपर किंग्जचा मुस्तफिजुर रहमान आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. सीएसकेच्या स्टार वेगवान गोलंदाजाने ४ सामन्यात ९ बळी घेतले आहेत. मुस्तफिजुरचा इकॉनॉमी रेट ८.०० आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

पंजाब किंग्जचा अर्शदीप सिंग आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अर्शदीपने ५ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

पर्पल कॅपच्या यादीत गुजरात टायटन्सचा मोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे. मोहितने सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ६ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर मुंबईचा गेराल्ड कोएट्झीच्या नावावर ८ विकेट्स आहेत. पण इकॉनॉमी रेटनुसार मोहित कोएट्झीच्या पुढे आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

ऑरेंज कॅपच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विराट कोहली अव्वल आहे. कोहलीने ६ सामन्यात ३१९ धावा केल्या आहेत. कोहलीने ७९.७५ च्या सरासरीने आणि १४१.७७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने ऑरेंज कॅपच्या लढाईत दुसरे स्थान कायम राखले आहे. रियानने सध्या ५ सामन्यात २६१ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८४ आहे. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल ऑरेंज कॅपच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आता ६ सामन्यात २५५ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८९ धावा आहे. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. संजूने आतापर्यंत ५ सामन्यात २४६ धावा केल्या आहेत. नाबाद ८२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ६ सामन्यात एकूण २२६ धावा आहेत. सुदर्शनची सर्वोच्च धावसंख्या ४५ आहे. 
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ६ सामन्यात एकूण २२६ धावा आहेत. सुदर्शनची सर्वोच्च धावसंख्या ४५ आहे. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज