(4 / 6)दरम्यान, गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामन्याच्या निकालाचा अव्वल तीन संघांवर परिणाम झाला नाही. कोलकाता नाईट रायडर्स ११ सामन्यांतील ८ विजयांसह १६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यांचे प्लेऑफचे तिकीट निश्चित दिसत आहे. कोलकाताचा नेट रनरेट +१.४५३ आहे. नाईट रायडर्सप्रमाणेच राजस्थान रॉयल्सचेही ११ सामन्यांत ८ विजयांसह १६ गुण आहेत. मात्र नेट रनरेटमुळे संजू सॅमसनचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचा नेट रनरेट +०.४७६ आहे.