मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 Points Table : दिल्लीची मोठी झेप, आयपीएलच्या गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानी? जाणून घ्या

IPL 2024 Points Table : दिल्लीची मोठी झेप, आयपीएलच्या गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानी? जाणून घ्या

Apr 18, 2024 01:01 PM IST Rohit Bibhishan Jetnavare

  • Indian Premier League 2024 Standings: आयपीएल २०२४ चा ३२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात दिल्लीने मोठा विजय मिळवला. यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.

दिल्ली-गुजरात सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात ८८ धावांवर गारद झाला. यानंतर दिल्लीने ८.५ षटकात लक्ष्य गाठले. या विजयानंतर दिल्ली गुणतालिकेत ६व्या क्रमांकावर आली आहे. दिल्लीचे ७ सामन्यांतून ६ गुण आहेत. म्हणजेच त्यांनी ३ सामने जिंकले आहेत आणि ४ सामने गमावले आहेत. त्यांचा नेट रनरेट -०.०७४ आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

दिल्लीकडून पराभूत झाल्यानंतर गुजरात टायटन्सला गुणतालिकेत एक पाऊल मागे जावे लागले आहे. ते सहाव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरले आहे. गुजरातने पहिल्या ७ पैकी ३ सामने जिंकले आहेत तर ४ सामने गमावले आहेत. दिल्लीप्रमाणेच टायटन्सचेही ६ गुण आहेत. नेट रनरेटमध्ये पिछाडीवर असल्याने गुजरात संघ गुणतालिकेत दिल्लीपेक्षा मागे आहे. त्यांचा नेट रनरेट -१.३०३ आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याच्या निकालाचा अव्वल ५ संघांवर कोणताच परिणाम झाला नाही. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानी आहे. रॉयल्सने ७ सामन्यात ६ विजयांसह १२ गुणांची कमाई केली आहे. संजू सॅमसनच्या संघाचा नेट रनरेट सध्या +०.६७७ आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी ६ सामने खेळले असून प्रत्येकी ४ सामने जिंकले आहेत. तर दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे या तीन संघांचे ८ गुण आहेत. नेट रनरेटच्या बाबतीत केकेआर (+१.३९९) लीग टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई (+०.७२६) आणि हैदराबाद (+०.५०२) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

लखनौ सुपर जायंट्सने ६ सामन्यात ६  गुणांची कमाई केली आहे. म्हणजेच त्यांनी ३ सामने जिंकले आहेत आणि तेवढेच सामने गमावले आहेत. नेट रनरेटच्या बाबतीत लखनौ दिल्ली आणि गुजरातपाठोपाठ लीग टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. सध्या त्यांचा नेट रनरेट +०.०३८ आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी ६ सामन्यांतून ४ गुण मिळवले आहेत. म्हणजेच त्यांनी २ सामने जिंकले आहेत आणि ४ सामने गमावले आहेत. नेट रनरेटच्या बाबतीत पंजाब (-०.२१८) लीग टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. मुंबई (-०.२३४) नवव्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांना दिल्लीच्या विजयामुळे एका स्थानाचे नुकसान झाले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पहिल्या ७ सामन्यांपैकी केवळ १ सामना जिंकला आहे. त्यांनी ६ सामने गमावले आहेत. आरसीबी २  गुणांसह तळाशी आहे. सध्या त्यांचा नेट रनरेट -१.१८५ आहे. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पहिल्या ७ सामन्यांपैकी केवळ १ सामना जिंकला आहे. त्यांनी ६ सामने गमावले आहेत. आरसीबी २  गुणांसह तळाशी आहे. सध्या त्यांचा नेट रनरेट -१.१८५ आहे. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज