आयपीएल २०२४ च्या ५० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना पार पडला. अखेरच्या षटकातील थरारानंतर हैदराबादने राजस्थान रॉयल्सकडून विजय हिरावून घेतला. सनरायझर्सने अवघ्या एका धावेने विजय मिळवला.
(AFP)या विजयासह सनरायझर्स हैदराबादने १० सामन्यांनंतर १२ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याखालोखाल चेन्नई सुपर किंग्जचा क्रमांक लागतो. सीएसकेचे १० सामन्यांत त्यांचे १० गुण आहेत.
(AP)विशेष म्हणजे, हा सामना गमावल्यानंतरही राजस्थान रॉयल्सने अव्वल स्थान कायम राखले. राजस्थान रॉयल्स १० सामन्यांनंतर १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
(PTI)कोलकाता नाईट रायडर्सचा सामना शुक्रवारी मुंबई इंडियन्सशी होणार आहे. या सामन्यात कोलकात्याने विजय मिळवला तर ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर येतील.
(PTI)आयपीएल २०२४ च्या ५० व्या सामन्यानंतर लीग टेबलमधील संघाच्या स्थानावर एक नजर टाकूया. १) राजस्थान रॉयल्स (९ सामने १६ गुण), २) कोलकाता नाईट रायडर्स (९ सामने १२ गुण) ३) लखनौ सुपर जायंट्स (१० सामने १२ गुण) ४) सनरायझर्स हैदराबाद (१० सामने १२ गुण) ५) चेन्नई सुपर किंग्ज (१० सामने १० गुण) ६) दिल्ली कॅपिटल्स (११ सामने १० गुण, १० गुण, १० गुण) ७) पंजाब किंग्ज (१० सामने ८ गुण) ७) गुजरात टायटन्स (१० सामने ८ गुण) ९) मुंबई इंडियन्स (१० सामने ६ गुण).
(PTI)