IPL 2024 Points Table: आरसीबीला हरवून लखनौची गुणतालिकेत मोठी झेप; पाहा इतर संघाची स्थिती
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 Points Table: आरसीबीला हरवून लखनौची गुणतालिकेत मोठी झेप; पाहा इतर संघाची स्थिती

IPL 2024 Points Table: आरसीबीला हरवून लखनौची गुणतालिकेत मोठी झेप; पाहा इतर संघाची स्थिती

IPL 2024 Points Table: आरसीबीला हरवून लखनौची गुणतालिकेत मोठी झेप; पाहा इतर संघाची स्थिती

Apr 03, 2024 10:57 AM IST
  • twitter
  • twitter
  • Rajasthan Royals Move on Top: आयपीएलच्या पंधराव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीला हरवून गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.
राजस्थान रॉयल्सने सोमवारी मुंबई इंडियन्सवर मात केली. राजस्थान रॉयल्स २०२४ च्या आयपीएल हंगामातील आपले पहिले तीन सामने जिंकणारा पहिला संघ ठरला. राजस्थानने लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवत आपल्या आयपीएल मोहिमेची सुरुवात केली. यानंतर त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. राजस्थानने सलग तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. राजस्थानचे आता ६ पॉईंट्स झाले आहे. संजू सॅमसनच्या संघाचा नेट रन रेट सध्या +१.२४९ आहे.
twitterfacebook
share
(1 / 10)

कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. नाइट्सने आतापर्यंतचे पहिले दोन सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात केकेआरने हैदराबादला पराभूत केले होते. त्यानंतर चिन्नास्वामी येथे झालेल्या सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला. केकेआरने आयपीएल २०२४ हंगामातील पहिले दोन सामने जिंकून चार गुणांची कमाई केली आहे. त्यांचा नेट रन रेट सध्या +१.०४७ आहे.
twitterfacebook
share
(2 / 10)

चेन्नई सुपर किंग्ज सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीला पराभूत केल्यानंतर सीएसकेने चेपॉक येथे झालेल्या दुसऱ्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. सीएसकेचे आता ३ सामन्यांतून ४ गुण झाले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाचा नेट रन रेट सध्या +०.९७६ इतका आहे. 
twitterfacebook
share
(3 / 10)

लखनौ सुपर जायंट्सने मंगळवारी चिन्नास्वामी येथे झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला. त्यामुळे त्यांनी गुणतालिकेत सहावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली. पहिल्या सामन्यात त्यांना राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला होता, पण दुसऱ्या सामन्यात घरच्या मैदानावर त्यांनी पंजाब किंग्जला पराभूत केल्यानंतर आता चिन्नास्वामी येथे आरसीबीचा पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सचे आता ३ सामन्यांतून ४ गुण झाले आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाचा नेट रन रेट +०.४८३ आहे.
twitterfacebook
share
(4 / 10)

लखनौच्या विजयानंतर गुजरात टायटन्सची एका स्थानाने घसरण झाली. गुजरातचा संघ चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत त्यांनी आयपीएल २०२४ च्या मोहिमेची सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात गुजरातला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. पण शुभमन गिलच्या संघाने पंजाब किंग्जला पराभूत करून पुन्हा पुनरागमन केले. गुजरातचे आता ३ सामन्यांतून ४ गुण झाले आहेत. टायटन्सचा नेट रन रेट सध्या -०.७३८ आहे.
twitterfacebook
share
(5 / 10)

सनरायझर्स हैदराबादने ईडन गार्डन्सवर केकेआरविरुद्ध च्या पराभवाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली, परंतु, दुसऱ्या सामन्यात त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पण पॅट कमिन्स ब्रिगेडला मात्र लीगच्या तिसऱ्या सामन्यात पुन्हा फटका बसला. रविवारी त्यांना गुजरातकडून पराभव पत्करावा लागला. गुजरातला ३ सामन्यांत २ पराभव आणि १ विजय मिळवता आला. पॅट कमिन्सच्या संघाचा नेट रन रेट सध्या +०.२०४ आहे.
twitterfacebook
share
(6 / 10)

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या डावात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. दिल्लीने यंदाच्या मोसमात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभवाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पण रविवारी सीएसकेला पराभूत करून त्यांनी कमबॅक केले. दिल्लीचे दोन गुण आहेत, दिल्ली कॅपिटल्सचा नेट रन रेट सध्या -०.०१६ आहे.
twitterfacebook
share
(7 / 10)

शिखर धवनने पहिल्या सामन्यात विजयाने सुरुवात केली, परंतु, पुढील दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावा लागले. पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजयाने सुरुवात केली. त्यानंतर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनौला सुपर जायंट्सविरुद्ध सलग दोन सामने गमावले. गुणतालिकेतही ते आठव्या स्थानावर घसरले. पंजाब किंग्जने यंदाच्या मोसमात तीन सामने खेळले आहेत. त्यांचे २ गुण आहेत. पंजाबचा नेट रन रेट सध्या -०.३३७ आहे.
twitterfacebook
share
(8 / 10)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पुन्हा पराभव झाला. मंगळवारी त्यांना लखनौकडून पराभव पत्करावा लागला. आरसीबीने घरच्या मैदानावर सलग दोन सामने गमावले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात सीएसकेकडून पराभूत होऊन मोसमाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पुनरागमन करत पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवला. पण आरसीबीला पुन्हा केकेआर आणि लखनौकडून पराभव पत्करावा लागला. आरसीबीचे ४ सामन्यांत २ गुण झाले आहेत. फाफ डु प्लेसिसच्या संघाचा नेट रन रेट आता -०.८७६ झाला आहे.
twitterfacebook
share
(9 / 10)

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ मध्ये पराभवाची हॅटट्रिक केली आहे. आता तो एकमेव असा संघ आहे ज्याला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. सोमवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात मुंबईला राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला. तसेच घरी. हार्दिक पांड्याचा संघ यंदाच्या आयपीएलमधील सर्वात अपयशी संघ ठरला आहे. त्यांना आपला पहिला सामना गुजरात जायंट्सकडून ६ धावांनी गमवावा लागला. यानंतर हैदराबादविरुद्ध ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्याच्या अखरेच्या सामन्यात राजस्थानने ६ विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचे ३ सामन्यांत शून्य गुण आहेत. मुंबईचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी आहे. मुंबईचा रनरेट -१.४२३ झाला आहे.
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज