मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  RCB च्या पराभवाने KKR ला धक्का, संजू सॅमसनचा संघ नंबर वन, टॉप ४ मध्ये कोण- कोणते संघ? पाहा

RCB च्या पराभवाने KKR ला धक्का, संजू सॅमसनचा संघ नंबर वन, टॉप ४ मध्ये कोण- कोणते संघ? पाहा

Apr 07, 2024 03:37 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • IPL 2024 Points Table : आयपीएल २०२४ चा १९ सामना (६ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थानने सहज विजय मिळवला. यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.

आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १९ सामने झाले आहेत. मोसमातील १९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून मोसमातील चौथा विजय मिळवला. या सामन्यानंतर, आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १९ सामने झाले आहेत. मोसमातील १९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून मोसमातील चौथा विजय मिळवला. या सामन्यानंतर, आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. (AFP)

राजस्थान रॉयल्स संघाने या मोसमात आतापर्यंत ४ सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. विजयी चौकार ठोकल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाला पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. राजस्थान रॉयल्स ४ विजयांसह अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून नंबर-वनचा चा मुकुट हिसकावून घेतला आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

राजस्थान रॉयल्स संघाने या मोसमात आतापर्यंत ४ सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. विजयी चौकार ठोकल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाला पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. राजस्थान रॉयल्स ४ विजयांसह अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून नंबर-वनचा चा मुकुट हिसकावून घेतला आहे. (AP)

कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत फक्त ३ सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. केकेआरचा नेट रन रेटही राजस्थानपेक्षा चांगला आहे. अशा परिस्थितीत ते आपला पुढचा सामना जिंकून पुन्हा एकदा अव्वल स्थानावर येऊ शकतात.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत फक्त ३ सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. केकेआरचा नेट रन रेटही राजस्थानपेक्षा चांगला आहे. अशा परिस्थितीत ते आपला पुढचा सामना जिंकून पुन्हा एकदा अव्वल स्थानावर येऊ शकतात.(PTI)

आरसीबी संघाची अवस्था वाईट - दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची खराब कामगिरी सुरूच आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. आरसीबी संघाने या मोसमात आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यापैकी त्यांना केवळ एकच सामना जिंकता आला असून ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या खराब कामगिरीमुळे ते गुणतालिकेत ८व्या क्रमांकावर आहेत. त्यांचा नेट रन रेट देखील -०.८४३ इतका आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

आरसीबी संघाची अवस्था वाईट - दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची खराब कामगिरी सुरूच आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. आरसीबी संघाने या मोसमात आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यापैकी त्यांना केवळ एकच सामना जिंकता आला असून ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या खराब कामगिरीमुळे ते गुणतालिकेत ८व्या क्रमांकावर आहेत. त्यांचा नेट रन रेट देखील -०.८४३ इतका आहे.(PTI)

टॉप-४ मध्ये कोणते संघ? - चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्ससह टॉप-4 मध्ये कायम आहेत. चेन्नई सुपर किंग्ज 4 सामन्यात २ विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनऊ सुपर जायंट्स संघ ३ सामन्यांत २ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

टॉप-४ मध्ये कोणते संघ? - चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्सचे संघ राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्ससह टॉप-4 मध्ये कायम आहेत. चेन्नई सुपर किंग्ज 4 सामन्यात २ विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनऊ सुपर जायंट्स संघ ३ सामन्यांत २ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज