IPL 2024 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सुनील नारायण आणि बटलरची एन्ट्री, आता नंबर वन कोण? पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सुनील नारायण आणि बटलरची एन्ट्री, आता नंबर वन कोण? पाहा

IPL 2024 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सुनील नारायण आणि बटलरची एन्ट्री, आता नंबर वन कोण? पाहा

IPL 2024 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सुनील नारायण आणि बटलरची एन्ट्री, आता नंबर वन कोण? पाहा

Apr 18, 2024 01:01 PM IST
  • twitter
  • twitter
  • IPL 2024 Orange Cap-Purple Cap : इंडियन प्रीमियर लीगचा हा मोसम जसजसा पुढे जात आहे, तसतशी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची लढाई अधिक रंजक होत चालली आहे. प्रत्येक सामन्यानंतर त्यात बदल होत आहे. संघांच्या गुणतालिकेतही बदल होत आहेत. सर्व संघांनी आतापर्यंत त्यांचे ६ ते ७ सामने खेळले आहेत.
या दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात (१६ एप्रिल) झालेल्या सामन्यात केकेआरकडून सुनील नारायण आणि आरआरकडून जोस बटलर यांनी शतके झळकावली. यासोबतच या दोन्ही खेळाडूंचा ऑरेंज कॅप शर्यतीत टॉप १० खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे.
twitterfacebook
share
(1 / 12)

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. त्याने या आतापर्यंत ७ सामने खेळले असून त्याच्या नावावर ३६१ धावा आहेत.
twitterfacebook
share
(2 / 12)

दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग आहे, त्याने ७ सामने खेळून ३१८ धावा केल्या आहेत. 
twitterfacebook
share
(3 / 12)

तर या दरम्यान, राजस्थानविरुद्ध शतक झळकावून केकेआरचा सुनील नारायण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. त्याने आतापर्यंत ६ सामन्यात २७६ धावा केल्या आहेत.
twitterfacebook
share
(4 / 12)

संजू सॅमसन चौथ्या स्थानावर- राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आता २७६ धावांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. संजू आणि सुनीलच्या धावा समान असल्या तरी सुनीलचा स्ट्राईक रेट जास्त आहे, त्यामुळे तो पुढे गेला आहे.  
twitterfacebook
share
(5 / 12)

तर रोहित शर्मा ६ सामन्यात २६१ धावा करून ५ व्या क्रमांकावर कायम आहे. यानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल ६ सामन्यात २५५ धावा करून सहाव्या स्थानावर आहे. 
twitterfacebook
share
(6 / 12)

सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन ६ सामन्यात २५३ धावांसह सातव्या स्थानावर आहे.  तर KKR विरुद्ध शतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या जोस बटलरच्या आता २५० धावा झाल्या असून तो थेट आठव्या स्थानावर आला आहे. चेन्नईचा शिवम दुबे २४२ धावांसह नवव्या तर हैदराबादचा ट्रॅव्हिस हेड २३५ धावांसह दहाव्या स्थानावर आहे.
twitterfacebook
share
(7 / 12)

पर्पल कॅपच्या यादीत युजवेंद्र चहलने मंगळवारी केकेआरविरुद्ध १ विकेट घेत आपले अव्वल स्थान मजबूत केले आहे. चहलने सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ७ सामन्यात १२ बळी घेतले आहेत. 
twitterfacebook
share
(8 / 12)

मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. बुमराहने सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ६ सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. 
twitterfacebook
share
(9 / 12)

चेन्नई सुपर किंग्जचा मुस्तफिजुर रहमान पर्पल कपच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेच्या स्टार वेगवान गोलंदाजाने ५ सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहएवढ्याच विकेट्स घेतल्या असल्या तरी इकॉनॉमी रेटमध्ये तो पिछाडीवर आहे. मुस्तफिजुरचा इकॉनॉमी रेट ९.१५ आहे. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी २९/४ अशी आहे. 
twitterfacebook
share
(10 / 12)

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स पर्पल कॅपच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. कमिन्सच्या नावावर आता ६ सामन्यात ९ विकेट्स आहेत. 
twitterfacebook
share
(11 / 12)

पंजाब किंग्जचा कॅगिसो रबाडा आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. रबाडाने सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ६ सामन्यात ९ विकेट घेतल्या आहेत. 
twitterfacebook
share
(12 / 12)

इतर गॅलरीज