मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 Orange-Purple Cap : ऑरेंज कॅप विराट कोहलीकडे तर पर्पल कॅप या भारतीय गोलंदाजाच्या डोक्यावर, पाहा

IPL 2024 Orange-Purple Cap : ऑरेंज कॅप विराट कोहलीकडे तर पर्पल कॅप या भारतीय गोलंदाजाच्या डोक्यावर, पाहा

Apr 29, 2024 05:32 PM IST Rohit Bibhishan Jetnavare

  • IPL 2024 Orange Cap And Purple Cap Updates: आयपीएल २०२४ चा लीग टप्पा आता वेगाने पुढे जात आहे. यंदा कोणते संघ प्लेऑफमध्ये जाणार आहेत, याचे चित्र येत्या २-३ दिवसांत स्पष्ट होईल. पण या दरम्यान, ऑरेंज कॅपची शर्यतही रंजक होत आहे.

मात्र, चांगली गोष्ट म्हणजे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये भारतीय खेळाडूंचा वरचष्मा आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

विराट कोहलीच्या ५०० धावा पूर्ण-  IPL २०२४ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा RCBचा फलंदाज विराट कोहलीने केल्या आहेत. त्याने आतापर्यंत १० सामने खेळून ५०० धावा केल्या आहेत. यावर्षी ५००चा आकडा गाठणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याच्या नावावर १ शतक आणि ४ अर्धशतके आहेत. तर ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ९ सामन्यात ४४७ धावा केल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

संजू सॅमसन आणि केएल राहुलही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शर्यतीत-  जर आपण टॉप २ फलंदाजांनंतर पुढील यादीबद्दल बोललो, तर गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने १० सामने खेळून ४१८ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ९ सामन्यांत ३८५ धावा करून चौथ्या स्थानावर आहे आणि LSG कर्णधार केएल राहुल ९ सामन्यांत ३७८ धावा करून पाचव्या स्थानावर आहे. म्हणजेच टॉप ५ मध्ये भारतीय फलंदाजांची ताकद पाहायला मिळते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

सुनील नारायण सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू - सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये KKRचा सुनील नारायण टॉपवर आहे. आतापर्यंत ८ सामन्यात ३५७ धावा करण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्याच्या नावावर १ शतक आणि २ अर्धशतके आहेत. एकूण यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे. अजून बरेच सामने बाकी असले आणि येत्या काही दिवसांत बरेच बदल होणार होऊ शकतात. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

आयपीएल २०२४ ची पर्पल कॅप सध्या जसप्रीत बुमराहच्या डोक्यावर आहे. मुंबई इंडियन्सच्या स्टार वेगवान गोलंदाजाने ९ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

सीएसकेच्या मुस्तफिजुर रहमाननेही आयपीएलमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने जसप्रीत बुमराहची बरोबरी केली आहे. मुस्तफिजुरने ८ सामन्यात १४ बळी घेतले आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्जच्या हर्षल पटेलनेही सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

सीएसकेच्या मुस्तफिजुर रहमाननेही आयपीएलमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने जसप्रीत बुमराहची बरोबरी केली आहे. मुस्तफिजुरने ८ सामन्यात १४ बळी घेतले आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्जच्या हर्षल पटेलनेही सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज