(3 / 7)म्हणजेच, मुस्तफिजुर रहमान पुन्हा एकदा पर्पल कॅपच्या शर्यतीत पुढे आला आहे. KKR विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, मुस्तफिजुर रहमानने ४ षटके टाकली आणि २२ धावा दिल्या. यादरम्यान त्याने श्रेयस अय्यर आणि मिचेल स्टार्कला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासह त्याने आता या मोसमात ४ सामन्यात ९ विकेट घेतल्या आहेत. तर चहलने ४ सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत.