(2 / 5)पंजाब किंग्जविरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात मोहित शर्माने १ विकेट घेत आयपीएलच्या चालू हंगामात संयुक्तपणे सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने ४ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या. चेन्नई सुपर किंग्जच्या मुस्तफिजुर रहमानने ३ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत. मात्र, इकॉनॉमी रेट चांगला असल्याने मोहितने या यादीत अव्वल स्थान पटकावले.(AP)