IPL 2024 साठीच्या लिलावात मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि डॅरिल मिशेल यां तिघांवरचर एकूण ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली. आता या तिघांच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजरा असतील.
(1 / 6)
आयपीएल २०२४ सुरू होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. यावेळी स्पर्धेतील काही खेळाडूंवर चाहत्यांचे विशेष लक्ष असेल. ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्क या लिलावात सर्वात महागडा ठरला. स्टार्कसोबत पॅट कमिन्स आणि न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलवर पैशांचा पाऊस पडला.यानंतर आता ते कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.(AFP)
(2 / 6)
स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले. त्याची बेस प्राइस २ कोटी रुपये होती. पण केकेआरने स्टार्कसाठी २४.७५ कोटी रुपये मोजले. स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. गुजरात टायटन्सनेही स्टार्कला विकत घेण्यासाठी मोठी बोली लावली होती. पण शेवटी केकेआरने बाजी मारली.(AFP)
(3 / 6)
पॅट कमिन्स हा आयपीएलचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. मात्र हैदराबादने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले.(AFP)
(4 / 6)
कमिन्सच्या कामगिरीवर नजर टाकली तर, त्याने आतापर्यंत ५२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात ५७ विकेट्स घेतल्या आहेत. कमिन्सने आयपीएलच्या ४२ सामन्यांत ४५ विकेट घेतल्या आहेत. कमिन्सने या स्पर्धेत ३७९ धावाही केल्या आहेत.(AFP)
(5 / 6)
(AFP)
(6 / 6)
मिशेलच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत फक्त २ सामने खेळले आहेत. यात त्याने ३३ धावा केल्या आहेत. मिशेलने २०२२ च्या आयपीएलमध्ये पदार्पण केले. आता तो पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. मिशेलचा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने ६२ सामन्यात १२६० धावा केल्या आहेत. यात त्याने ७ अर्धशतके केली आहेत.(AFP)