GT vs MI IPL 2024 : हार्दिक पांड्या आज गुजरातला भिडणार, या तीन खेळाडूंवर असतील चाहत्यांचा नजरा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  GT vs MI IPL 2024 : हार्दिक पांड्या आज गुजरातला भिडणार, या तीन खेळाडूंवर असतील चाहत्यांचा नजरा

GT vs MI IPL 2024 : हार्दिक पांड्या आज गुजरातला भिडणार, या तीन खेळाडूंवर असतील चाहत्यांचा नजरा

GT vs MI IPL 2024 : हार्दिक पांड्या आज गुजरातला भिडणार, या तीन खेळाडूंवर असतील चाहत्यांचा नजरा

Mar 24, 2024 03:36 PM IST
  • twitter
  • twitter
  • GT vs MI IPL 2024 : आयपीएलचा पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजेपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात कोणत्या खेळाडंवर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत, याबाबत जाणून घेऊया.
मुंबई आणि गुजरात या दोन्ही संघांचा हा यंदाचा पहिला सामना असेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. या दोन्ही संघांमध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे एकट्याच्या बळावर सामना फिरवू शकतात.
twitterfacebook
share
(1 / 6)

हार्दिक पांड्या - गेल्या मोसमात हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचे २ सीझनमध्ये नेतृत्व केले, दोन्ही वेळा संघ अंतिम फेरीत पोहोचला. पण आता हार्दिक पांड्या त्याच्या जुन्या टीम मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला आहे. 
twitterfacebook
share
(2 / 6)

अशा स्थितीत हार्दिंक पांड्यावर चाहत्यांचे लक्ष असणार आहे. पांड्या फलंदाजीव्यतिरिक्त आपल्या गोलंदाजीनेही सामन्याचा निकाल बदलू शकतो. 
twitterfacebook
share
(3 / 6)

जसप्रीत बुमराह-  जसप्रीत बुमराहची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. विशेषत: जसप्रीत बुमराह एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमधील घातक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.  नवीन चेंडूशिवाय बुमराह डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट यॉर्करसाठी ओळखला जातो. आत्तापर्यंत जसप्रीत बुमराहने आयपीएलचे १२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १४५ फलंदाजांना बाद केले आहे. 
twitterfacebook
share
(4 / 6)

राशीद खान-  अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान हा विरोधी फलंदाजांसाठी न उलगडणारे कोडे राहिले आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सला या गोलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा असतील. त्याचबरोबर राशिद खानच्या चेंडूंवर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. 
twitterfacebook
share
(5 / 6)

विकेट घेण्यासोबतच रशीद खान धावा रोखण्यातही माहीर आहे. या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर धावा काढणे हे फलंदाजांसाठी कठीण आव्हान आहे. याशिवाय गरज पडल्यास रशीद खान बॅटनेही योगदान देऊ शकतो.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज