वेस्ट इंडिजच्या ३५ वर्षीय अनुभवी खेळाडूने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर अवघ्या ४९ चेंडूत शानदार शतक झळकावले. केकेआरकडून आयपीएल शतक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला.
(PTI)याआधी कोलकाताकडून ब्रेंडन मॅक्युलम (२००८) आणि व्यंकटेश अय्यर (२०२३) यांनीच शतके झळकावली होती. या यादीत सुनील नारायणने समावेश केला आहे. सुनील नारायणने आयपीएलमध्ये आतापर्यंत १६८ सामने खेळले असून ५०३ टी-२० सामने खेळले आहेत.
(ANI )अखेर नारायणला ट्रेंट बोल्टने ५६ चेंडूत १०९ धावांवर बाद केले. त्याने १९४.६४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. यात १३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. यासह नारायणने एक खास विक्रम रचला आहे.आयपीएल इतिहासात शतक झळकावणारा आणि १०० बळी घेणारा तो पहिला खेळाडू ठरला.
(PTI)