IPL 2024 : आगामी आयपीएलच्या तारखा निश्चित झाल्याचे समोर आले आहे. आयपीएल २०२४ हे २२ मार्च ते २६ मे या कालाधीत खेळले जाणार असल्याचे समोर आले आहे.
(1 / 5)
आयपीएलचा १७ वा सीझन २२ मार्च ते २६ मे दरम्यान खेळवला जाणार आहे. याआधी महिला प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला प्रीमियर लीगचे सामने २२ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान खेळवले जातील.
(2 / 5)
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने आयपीएल २०२४ च्या तारखा निश्चित केल्या आहेत. यानुसार २२ मार्चला आयपीएलचा पहिला सामना खेळला जाईल. तर २६ मेला आयपीएल फायनल होईल. मात्र, या तारखांवर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
(3 / 5)
जर हेच वेळापत्रक अंतिम राहिले तर टी-20 विश्वचषकासाठी केवळ ५ दिवसांचा वेळ शिल्लक राहिल. टी-20 वर्ल्ड कप १ जूनपासून सुरू होणार आहे. तर, टीम इंडियाला पहिला सामना ५ जूनला खेळायचा आहे.
(4 / 5)
पण आयपीएलचे वेळापत्रक या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे प्रभावितदेखील होऊ शकते. कारण आयपीएल सुरू असेल त्याचवेळी भारतात लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुका मार्चपासून सुरू होऊन मेपर्यंत चालणार आहेत. अशा स्थितीत बीसीसीआय आधी आणि सरकारशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
(5 / 5)
लोकसभा निवडणुका असूनही आयपीएल यंदा भारतातच होईल, असे बोलले जात आहे. पण याआधी २००९ आणि २०१४ साली लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल भारताबाहेर आयोजित करण्यात आले होते. पण, २०१९ मध्ये तसे झाले नव्हते.