मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  KKR vs SRH : पॅट कमिन्सच्या या चुकांमुळे केकेआर चॅम्पियन, हैदराबादच्या पराभवाची ५ कारणं, जाणून घ्या

KKR vs SRH : पॅट कमिन्सच्या या चुकांमुळे केकेआर चॅम्पियन, हैदराबादच्या पराभवाची ५ कारणं, जाणून घ्या

May 26, 2024 11:10 PM IST Rohit Bibhishan Jetnavare

  • Reasons Why SRH Lost Final Against KKR : आयपीएल २०२४ ची फायनल (२६ मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळली गेली. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. हैदराबादच्या पराभवाची नेमकी कारणं काय? ते जाणून घेऊ.

आयपीएल २०२४च्या फायनल सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने अनेक चुका केल्या, त्यामुळे त्यांना सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. चला तर मग जाणून घेऊया या सामन्यात हैदराबादच्या पराभवाची ५ सर्वात मोठी कारणे कोणती होती.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

आयपीएल २०२४च्या फायनल सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने अनेक चुका केल्या, त्यामुळे त्यांना सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. चला तर मग जाणून घेऊया या सामन्यात हैदराबादच्या पराभवाची ५ सर्वात मोठी कारणे कोणती होती.(PTI)

१) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी- चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. नाणेफेक गमावल्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला होता की ही लाल मातीची खेळपट्टी आहे, जिथे तो प्रथम गोलंदाजी करू इच्छितो. कमिन्सने खेळपट्टी ओळखण्यात चूक केली.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

१) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी- चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. नाणेफेक गमावल्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला होता की ही लाल मातीची खेळपट्टी आहे, जिथे तो प्रथम गोलंदाजी करू इच्छितो. कमिन्सने खेळपट्टी ओळखण्यात चूक केली.(PTI)

२) हैदराबादचे टॉपचे फलंदाज मिचेल स्टार्कला खेळू शकले नाहीत- कोलकाताचा मिचेल स्टार्क हैदराबादसाठी मोठी अडचण ठरला. स्टार्कने अभिषेक शर्माच्या रूपाने हैदराबादला पहिला धक्का दिला. स्टार्कने पहिल्याच षटकात धोकादायक आऊट स्विंग बॉलवर अभिषेकला बोल्ड केले होते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

२) हैदराबादचे टॉपचे फलंदाज मिचेल स्टार्कला खेळू शकले नाहीत- कोलकाताचा मिचेल स्टार्क हैदराबादसाठी मोठी अडचण ठरला. स्टार्कने अभिषेक शर्माच्या रूपाने हैदराबादला पहिला धक्का दिला. स्टार्कने पहिल्याच षटकात धोकादायक आऊट स्विंग बॉलवर अभिषेकला बोल्ड केले होते.(PTI)

३) प्लॅन बी नसणे-  हैदराबादने संपूर्ण स्पर्धेत आक्रमक फलंदाजी केली. पण फायनलमध्ये त्यांचा हा डाव फसला. आक्रमक फलंदाजीशिवाय संघाकडे दुसरा कोणताही प्लॅन 'बी' नव्हता. खरे तर, लवकर विकेट पडल्यानंतर, संघाचा एकही फलंदाज अँकरची भूमिका बजावू शकला नाही आणि डाव पुढे नेऊ शकला नाही. प्रत्येकाने वेगवान फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि झटपट विकेट गमावल्या, त्यामुळे १८.३ षटकांत ते ११३ धावांवर गारद झाले.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

३) प्लॅन बी नसणे-  हैदराबादने संपूर्ण स्पर्धेत आक्रमक फलंदाजी केली. पण फायनलमध्ये त्यांचा हा डाव फसला. आक्रमक फलंदाजीशिवाय संघाकडे दुसरा कोणताही प्लॅन 'बी' नव्हता. खरे तर, लवकर विकेट पडल्यानंतर, संघाचा एकही फलंदाज अँकरची भूमिका बजावू शकला नाही आणि डाव पुढे नेऊ शकला नाही. प्रत्येकाने वेगवान फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि झटपट विकेट गमावल्या, त्यामुळे १८.३ षटकांत ते ११३ धावांवर गारद झाले.(AP)

४) दोन्ही सलामीवीर फ्लॉप झाले - आयपीएल २०२४ मध्ये जेव्हा जेव्हा हैदराबादने मोठी धावसंख्या उभारली तेव्हा संघाच्या सलामीवीरांनी चमकदार कामगिरी केली. मात्र सलामीवीर अपयशी ठरताच संघाची फरफट झाली आणि अंतिम सामन्यातही तेच झाले. आज हैदराबादचे दोन्ही सलामीवीर सपशेल फ्लॉप ठरले. अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात २ धावांवर बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेड दुसऱ्याच षटकात गोल्डन डकवर बाद झाला.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

४) दोन्ही सलामीवीर फ्लॉप झाले - आयपीएल २०२४ मध्ये जेव्हा जेव्हा हैदराबादने मोठी धावसंख्या उभारली तेव्हा संघाच्या सलामीवीरांनी चमकदार कामगिरी केली. मात्र सलामीवीर अपयशी ठरताच संघाची फरफट झाली आणि अंतिम सामन्यातही तेच झाले. आज हैदराबादचे दोन्ही सलामीवीर सपशेल फ्लॉप ठरले. अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात २ धावांवर बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेड दुसऱ्याच षटकात गोल्डन डकवर बाद झाला.(PTI)

५) संघात चांगला स्पिनर नसणे- चेन्नईच्या खेळपट्टीवर, विशेषत: लाल मातीच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसोबतच फिरकीपटूही महत्त्वाची भूमिका बजावतात. लाल मातीच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना चांगला टर्न मिळतो. पण हैदराबादकडे फारसे चांगले फिरकीपटू नव्हते, त्यामुळे ते एकूण बचाव करताना सामना वाचवू शकले नाहीत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

५) संघात चांगला स्पिनर नसणे- चेन्नईच्या खेळपट्टीवर, विशेषत: लाल मातीच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसोबतच फिरकीपटूही महत्त्वाची भूमिका बजावतात. लाल मातीच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना चांगला टर्न मिळतो. पण हैदराबादकडे फारसे चांगले फिरकीपटू नव्हते, त्यामुळे ते एकूण बचाव करताना सामना वाचवू शकले नाहीत.(PTI)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज