मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2023 : यंदाच्या आयपीएलनंतर हे ५ दिग्गज रिटायर होणार? पाहा

IPL 2023 : यंदाच्या आयपीएलनंतर हे ५ दिग्गज रिटायर होणार? पाहा

Mar 26, 2023 10:27 PM IST
  • twitter
  • twitter
these five cricketer may retire after IPL 2023 : आयपीएल १६ चा थरार ३१ मार्चपासून रंगणार आहे. आयपीएलचा प्रत्येक मोसम चाहत्यांसाठी उत्सुकतेने भरलेला असतो. पण यंदाचा हंगाम चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. कारण या आयपीएल सीझननंतर काही दिग्गज खेळाडू निवृत्त होऊ शकतात. या यादीत एम एस धोनी पासून ते दिनेश कार्तिकसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे, जे आयपीएल २०२३ नंतर निवृत्त होऊ शकतात. 
M S Dhoni - या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. ४१ वर्षीय धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असू शकते. सीएसकेच्या फ्रेंचायझीने चॅपॉक स्टेडियमवर धोनीच्या निरोपाची विशेष तयारीदेखील केल्याचे बोलले जात आहे.
share
(1 / 6)

Ambati Rayudu - चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा अंबाती रायडू या यादीत दुसरा खेळाडू आहे. IPL 2022 च्या हंगामात ३८ वर्षीय राडूचा फॉर्म चांगला नव्हता. त्याने १३ सामन्यात केवळ २७४  धावा केल्या. अशा परिस्थितीत ही त्याची शेवटची आयपीएल असेल, असा अंदाज आहे.
share
(2 / 6)

Amit Mishra - अमित मिश्रा यंदाच्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून दिसणार आहे. ४० वर्षीय अमित मिश्रासाठी ही शेवटची आयपीएल असेल अशी अपेक्षा आहे. या मोसमानंतर तो स्पर्धेतून निवृत्ती जाहीर करू शकतो.
share
(3 / 6)

David Warner - या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचेही नाव आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नर यंदा दिल्लीची धुरा सांभाळणार आहे. त्याचबरोबर पंतच्या पुनरागमनानंतर त्याला कर्णधारपदावरून दूर केले जाऊ शकते. अशा स्थितीत ३६ वर्षीय वॉर्नर यंदाच्या आयपीएलनंतर क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो.
share
(4 / 6)

Dinesh Karthik - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचाही या यादीत समावेश आहे. आयपीएल २०२२ कार्तिकसाठी खूप चांगले होते. कार्तिक ३७ वर्षांचा आहे. अशा स्थितीत त्याची यंदाची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. जर तो यंदा चांगली कामगिरी करू शकला नाही तर आरसीबी त्याला पुढच्या मोसमात रिटेन करणार नाही.
share
(5 / 6)

these five cricketer may retire after ipl 2023
share
(6 / 6)
these five cricketer may retire after ipl 2023(photos - players instagram)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज