मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2023 Longest Six : रसेल ते हॅरी ब्रुक… हे ६ फलंदाज ठोकणार या आयपीएलचा सर्वात लांब षटकार

IPL 2023 Longest Six : रसेल ते हॅरी ब्रुक… हे ६ फलंदाज ठोकणार या आयपीएलचा सर्वात लांब षटकार

Apr 01, 2023 06:35 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • IPL 2023 Longest Six : आयपीएल 2023 मध्ये जगभरातील सर्व स्फोटक फलंदाज सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत, यावेळी कोणते फलंदाज सर्वात लांब षटकार ठोकू शकतात, हे जाणून घेऊया

Liam Livingstone -इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो.  लिव्हिंगस्टोन लांब षटकार मारण्यात माहिर आहे. अशा स्थितीत, यावेळी तो आयपीएलमधील सर्वात लांब षटकार मारण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. लिव्हिंगस्टोन हा पंजाब किंग्ज संघाचा भाग आहे.

(1 / 7)

Jos Buttler - आयपीएलच्या याआधीच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा जॉस बटलरही एकदा सेट झाल्यावर गोलंदाजांची धुलाई करण्यास माहीर आहे. जर चेंडू त्याच्या बॅटला बरोबर लागला तर तो स्टेडियमच्या पलीकडे जातो. राजस्थान रॉयल्सचा हा सलामीवीर यावेळीही वादळ निर्माण करू शकतो. तो या आयपीएलमधील सर्वात लांब षटकार ठोकू शकतो.

(2 / 7)

Glenn Maxwell - ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल बऱ्याच दिवसांपासून लयीत नाही. मात्र, या मोसमात तो फॉर्ममध्ये परतला तर तोदेखील आयपीएलचा सर्वात लांब षटकार मारू शकतो. तो आरसीबीकडून खेळणार आहे.

(3 / 7)

Harry Brook - या यादीत इंग्लंडच्या आणखी एका खेळाडूचा समावेश आहे. युवा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकने आपल्या वेगवान फलंदाजीने सर्वांना आकर्षित केले आहे. ब्रूककडे लांब षटकार मारण्याची क्षमताही आहे. यावेळी तो आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे.

(4 / 7)

Rovman Powell - दिल्ली कॅपिटल्सचा झंझावाती फलंदाज रोव्हमन पॉवेल हाही सिक्सर किंग आहे. त्याला लांब षटकारही मारायला आवडतात. अशा स्थितीत विंडीजचा हा फलंदाज यावेळी सर्वात लांब षटकारही ठोकू शकतो. तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आहे.

(5 / 7)

Andre Russell - कोलकाता नाईट रायडर्सचा कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची खेळण्याची शैली सर्वांनाच माहीत आहे. हा फलंदाज खेळपट्टीवर येताच गोलंदाजांवर बरसतो. रसेलने यापूर्वीही आयपीएलमध्ये अनेक लांब षटकार ठोकले आहेत. यावेळीही तो अशीच कामगिरी करू शकतो.

(6 / 7)

IPL 2023 Longest Six

(7 / 7)

IPL 2023 Longest Six(photos - instagram)

WhatsApp channel

इतर गॅलरीज