गुजरात टायटन्सने शानदार कामगिरी करत IPL 2023 च्या फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. गुजरात संघाच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
गुजरातसाठी शुभमनने १६ सामन्यात स्फोटक फलंदाजी करताना ८५१ धावा केल्या. या मोसमात त्याने ३ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली. शुभमन संघाला चांगली सुरुवात करून देत आहे. ही जबाबदारी त्याने चोखपणे पार पाडली.
(PHOTOS- IPLT20.COM)गुजरातचे ३ गोलंदाज मोहम्मद शमी, राशिद खान आणि मोहित शर्मा यांनी मिळून ७९ बळी घेतले. हे तिघेही या मोसमात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. शमी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने २८ विकेट घेतल्या आहेत. राशिद खानने २७ विकेट घेतल्या आहेत. तर मोहित शर्माने २४ विकेट घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मोहित शर्माने शानदार गोलंदाजी केली. त्याने आवघ्या २.२ षटकात १० धावा देत ५ बळी घेतले.