IPL 2022 Final: पहिल्याच सीझनमध्ये गुजरात टायटन्सने पटकावलं IPL चं विजेतेपद
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2022 Final: पहिल्याच सीझनमध्ये गुजरात टायटन्सने पटकावलं IPL चं विजेतेपद

IPL 2022 Final: पहिल्याच सीझनमध्ये गुजरात टायटन्सने पटकावलं IPL चं विजेतेपद

IPL 2022 Final: पहिल्याच सीझनमध्ये गुजरात टायटन्सने पटकावलं IPL चं विजेतेपद

May 30, 2022 09:43 AM IST
  • twitter
  • twitter
  • गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ चे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. गुजरातने आयपीएलच्या १५ व्या मोसमातील अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सनी पराभव केला आहे. राजस्थानने दिलेले १३१ धावांचे आव्हान गुजरातने १८.१ षटकात पूर्ण केले. गुजरात टायटन्सने पहिल्यांदाच आयपीएलसारख्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांनी हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सीझनमध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. यामुळे तब्बल ५ वर्षांनंतर आयपीएलला नवा चॅम्पियन मिळाला.
Hardik Pandya of Gujarat Titans celebrates the wicket of Jos Buttler of Rajasthan Royals during the final
twitterfacebook
share
(1 / 9)
Hardik Pandya of Gujarat Titans celebrates the wicket of Jos Buttler of Rajasthan Royals during the final(PTI)
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही राजस्थानची फलंदाजी ढेपाळली. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या.
twitterfacebook
share
(2 / 9)
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही राजस्थानची फलंदाजी ढेपाळली. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक ३९ धावा केल्या.(PTI)
१३१ धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या डेव्हिड मिलरने आक्रमक फलंदाजी केली. मिलरने १९ चेंडूत ३२ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि एक षटकार खेचला.
twitterfacebook
share
(3 / 9)
१३१ धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या डेव्हिड मिलरने आक्रमक फलंदाजी केली. मिलरने १९ चेंडूत ३२ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि एक षटकार खेचला.(PTI)
युझवेंद्र चहलने आयपीएलच्या अंतिम सामन्यात एक फलंदाज बाद केला. याआधीच्या दोन सामन्यात चहलला एकही विकेट मिळाला नव्हता. चहलने हार्दीक पांड्याला बाद करताच आयपीएल २०२२ ची पर्पल कॅप आपल्या नावे केली.
twitterfacebook
share
(4 / 9)
युझवेंद्र चहलने आयपीएलच्या अंतिम सामन्यात एक फलंदाज बाद केला. याआधीच्या दोन सामन्यात चहलला एकही विकेट मिळाला नव्हता. चहलने हार्दीक पांड्याला बाद करताच आयपीएल २०२२ ची पर्पल कॅप आपल्या नावे केली.(PTI)
आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने अष्टलपैलू कामगिरी केली. त्याने सुरुवातीला गोलंदाजीत अवघ्या १७ धावा देत राजस्थानचे महत्वाचे फलंदाज तंबूत पाठवले. त्यानंतर फलंदाजीत महत्वपूर्ण ३४ धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे तो आयपीएल फायनलमधला प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.
twitterfacebook
share
(5 / 9)
आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने अष्टलपैलू कामगिरी केली. त्याने सुरुवातीला गोलंदाजीत अवघ्या १७ धावा देत राजस्थानचे महत्वाचे फलंदाज तंबूत पाठवले. त्यानंतर फलंदाजीत महत्वपूर्ण ३४ धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे तो आयपीएल फायनलमधला प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.(PTI)
गुजरात टायटन्सने पहिल्यांदाच आयपीएलसारख्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांनी हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सीझनमध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. 
twitterfacebook
share
(6 / 9)
गुजरात टायटन्सने पहिल्यांदाच आयपीएलसारख्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांनी हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सीझनमध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. (PTI)
 गुजरातच्या या विजेतेपदामुळे तब्बल ५ वर्षांनंतर आयपीएलला नवा चॅम्पियन मिळाला. याआधी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांचे या स्पर्धेवर वर्चस्व होते.
twitterfacebook
share
(7 / 9)
 गुजरातच्या या विजेतेपदामुळे तब्बल ५ वर्षांनंतर आयपीएलला नवा चॅम्पियन मिळाला. याआधी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांचे या स्पर्धेवर वर्चस्व होते.(PTI)
आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सची सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी राहिली आहे. हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासूनच स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले. संघाने सांघिक कामिगीरीच्या जोरावर यंदाचे आयपीएल जेतेपद पटकावले.
twitterfacebook
share
(8 / 9)
आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सची सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी राहिली आहे. हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासूनच स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले. संघाने सांघिक कामिगीरीच्या जोरावर यंदाचे आयपीएल जेतेपद पटकावले.(PTI)
आयपीएल २०२२ मधील विजेता संघ गुजरात टायटन्सला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याहस्ते आयपीएलची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. आयपीएलच्या अंतिम सामन्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक बॉलीवूड कलाकारांनी तसेच सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.
twitterfacebook
share
(9 / 9)
आयपीएल २०२२ मधील विजेता संघ गुजरात टायटन्सला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याहस्ते आयपीएलची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. आयपीएलच्या अंतिम सामन्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक बॉलीवूड कलाकारांनी तसेच सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.(PTI)
इतर गॅलरीज