दरवर्षी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. योग आपल्या रोजच्या जीवनशैलीत फार महत्वाचा भाग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतही योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. आरोग्य आणि वजनाच्या बाबतीत योग ही अनेक लोकांची पहिली पसंती आहे. योग दिनाच्या या निमित्ताने बी-टाउनमधील ४० ओलांडलेल्या अभिनेत्रींचे रहस्य जाणून घेऊया...
अभिनेत्री मलायका अरोरा ही फिटनेससाठी विशेष ओळखली जाते. वयाच्या ४७ वर्षी देखील ती अतिशय फीट आहे आणि तिच्या फिट मागचे रहस्य योग असल्याचे म्हटले जात आहे.
अभिनेत्री करीना कपूरचा प्रेगन्सी नंतरचा फिटनेस प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. योगाच्या मदतीने ती पुन्हा फिट झाली आहे.
अनुष्का शर्माचा फिटनेसचा दृष्टीकोन सर्वांगीण तंदुरुस्तीच्या भोवती फिरतो आणि तो समतोल साधण्यात योगाची भूमिका महत्त्वाची आहे. योगाभ्यास करून, ती केवळ तिची शारीरिक शक्ती आणि लवचिकता वाढवत नाही तर तिच्या आंतरिक तेजाचे पालनपोषण देखील करते. अनुष्काचा असा विश्वास आहे की योगामुळे शरीर आणि मन दोन्हीमध्ये सुसंवाद येतो, आंतरिक शांतीची भावना वाढीस लागते.
नर्गिस फाखरीच्या फिटनेस प्रवास उल्लेखनीय आहे. तिचा आणि योगाचा जवळचा संबंध आहे. विविध योग आसनांचा सराव करून ती फीट आहे. मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवादी संतुलन योगाने साधले जाते. नर्गिसचा असा विश्वास आहे की योगा तिला केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवत नाही तर तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत करते आणि एकंदर आरोग्यास प्रोत्साहन देते.