International Friendship Day: आज (६ ऑगस्ट) सर्वत्र फ्रेंडशीप डे साजरा होत आहे. क्रिकेट जगतातही अनेक खेळाडू एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. यामध्ये अनेक खेळाडू असे आहेत, जे त्यांच्या शाळा-कॉलेजच्या दिवसांपासून मित्र आहेत आणि आता ते देशाकडून एकत्र क्रिकेटही खेळत आहेत.
(1 / 14)
विराट कोहली-एमएस धोनी, संगकारा-जयवर्धने, द्रविड-लक्ष्मण, कोहली-एबीडी, सचिन-कांबळी,. अशा मित्रांच्या अनेक जोड्या क्रिकेटच्या जगतात आहेत. आज फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने या जोड्यांबाबत जाणून घेणार आहोत.
(2 / 14)
एमएस धोनी आणि सुरेश रैना हे दोन भारतीय क्रिकेटपटू खूप चांगले मित्र आहेत. हे दोघे सुरुवातीपासूनच भारतासाठी एकत्र खेळले. यानंतर सीएसकेकडूनही एकत्र खेळले. विशेष म्हणजे, दोघांनी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
(3 / 14)
एमएस धोनी-विराट कोहली हे दिग्गज आहेत. तसेच जीवलग मित्रही आहेत, हे सर्व जगाला माहीत आहे. धोनीने वाईट काळात विराटला अनेकदा मदत केली आहे. कोहली नेहमीच धोनीसोबत त्याचे चढ-उतार शेअर करत असतो.
(4 / 14)
हार्दिक पंड्या आणि केएल राहुल चांगले मित्र आहेत. त्यांची मैत्री आयपीएलपासून सुरू झाली. उत्तम सौहार्द असलेली ही जोडी मैदानाबाहेरही एकत्र हँग आउट करतात.
(5 / 14)
युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्यातील नात्याला मोठा इतिहास आहे. मधुर बंध असलेले हे जोडपे अनेक मित्रांसाठी आदर्श आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत युव म्हणाला होता की, कोहलीमुळेच मी संघात पुनरागमन करू शकलो. कोहलीनेही अनेकदा युवीचे कौतुक केले आहे. त्यांची ऑफफील्ड केमिस्ट्री अप्रतिम आहे.
(6 / 14)
विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे चांगले मित्र आहेत. त्यांची मैत्री शब्दांच्या पलीकडची आणि अवर्णनीय आहे. २०११ मध्ये त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी एकत्र खेळायला सुरुवात केल्यानंतर या दोघांमध्ये मैत्रीचे बंध वाढले.
(7 / 14)
भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली हे बेस्ट फ्रेंड्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. गांगुली कर्णधार असताना सचिनने आपल्याला खूप साथ दिली. असे गांगुलीने अनेकदा सांगितले आहे. या जोडीने मैदानावर अनेक संस्मरणीय खेळीही बांधल्या आहेत.
(8 / 14)
लेगस्पिनर युझवेंद्र चहलचे रोहित शर्माशी जवळचे नाते आहे. चहल रोहितला आपला मोठा भाऊ मानतो.
(9 / 14)
कर्नाटकच्या केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेपासून ते भारतीय संघ असा एकत्र प्रवास केला आहे.
(10 / 14)
युवराज सिंग आणि हरभजन सिंग हे देखील बेस्ट फ्रेंड आहेत. मैदानावर ते खूप आक्रमक होते. काहीही झाले तरी ते एकमेकांना साथ देताना दिसतात. दोघांनी भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
(11 / 14)
बेस्ट फ्रेंड्सच्या जोजड्या फक्त पुरुष क्रिकेटमध्येच नाही तर महिला क्रिकेटमध्येही आहेत. त्यापैकीच एक जोडी जमैमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना यांची आहे. मैदानावर असो, मैदानाबाहेर असो, सोशल मीडिया असो; ते एकमेकांसोबत मजा मस्ती करताना दिसतात.
(12 / 14)
राहुल द्रविड - व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारतीय संघाला अनेक कसोटी सामने जिंकून दिले आहेत. दोघांनी मैदानावर फलंदाजी करताना खूप वेळ घालवला आहे.
(13 / 14)
महेला जयवर्धने-कुमार संगकारा या जोडीने श्रीलंका क्रिकेटला वेगळ्याच उंचीवर पोहोचवले होते. दोघांनीही मैदानावर खूप वेळ एकत्र घालवला आहे. तसेच, श्रीलंकेला अनेक मालिका, सामने जिंकून दिले आहेत.
(14 / 14)
विनोद कांबळी सचिन तेंडुलकर हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. नंतर दोघे टीम इंडियातही एकत्र क्रिकेट खेळले.