मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ira-Nupur Wedding: आयरा आणि नुपूरचा स्वप्नवत विवाह सोहळा! पाहा लग्नातील खास क्षणांचे फोटो...

Ira-Nupur Wedding: आयरा आणि नुपूरचा स्वप्नवत विवाह सोहळा! पाहा लग्नातील खास क्षणांचे फोटो...

Jan 11, 2024 05:57 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Ira Khan and Nupur Shikhare Dream Wedding: मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता आमिर खानची लेक आयरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे हे दोघे उदयपूरमधील आलिशान रिसॉर्टमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न बंधनात अडकले आहेत.

मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता आमिर खानची लेक आयरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे हे दोघे उदयपूरमधील आलिशान रिसॉर्टमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या या स्वप्नवत लग्नाचे काही खास क्षण आता चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. आयरा आणि नुपूरच्या या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो समोर आले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

अरवली पर्वतांच्या साक्षीने हे दोघे आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथी बनले आहेत. एखाद्या परीकथेतील दृश्य वाटावीत अशी या लग्न सोहळ्याची क्षणचित्र सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहेत. या फोटोमध्ये आयरा आणि नुपूर लग्नाच्या आणाभाका घेताना दिसत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

आपल्या लेकीच्या लग्नात पापा आमिर खान आणि आई रीना दत्ता यांनी पावलोपावली आयराची साथ दिली. दोघांनीही आपल्या लेकीसोबत चालण्याची प्रथा पार पाडली. यावेळी रीना दत्ता यांनी पांढऱ्या रंगाची नेट साडी नेसली होती. तर, आमिर खान याने काळ्या रंगाचा टक्सिडो घातला होता. तर, आयरा देखील ख्रिश्चन वेडिंग गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती.   
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

उदयपूर ताज अरवली रिसॉर्टमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यातील एका खास क्षणी बाबा आमिर खान आपल्या लेकीची म्हणजेच आयरा खान हिची हेअरस्टाईल सरळ करताना दिसला. तर, रीना दत्ता बाप-लेकीचा हा हळवा क्षण कौतुकाने बघत होत्या. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

या ड्रीम वेडिंगसाठी नुपूर शिखरे याने बेज रंगाचा टक्सिडो सूट परिधान केला होता. यावेळी नुपूरची आई प्रीतम शिखरे या त्याची साथ देताना दिसल्या. नुपूर आपल्या आईचा हात हातात घेऊन लग्नाच्या ठिकाणी पोहोचला होता.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

या लग्न सोहळ्यातील एका खास क्षणी नुपूर आणि आयरा अगदी दिलखुलास हसताना दिसले. दोघेही आपल्या लग्नाच्या आणाभाका घेताना खूप खुश दिसत होते. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

ख्रिश्चन पद्धतीने लग्न बंधनात अडकल्यावर नुपूर शिखरे आणि आयरा खान यांनी एकमेकांना किस केलं. दोघांचा हा गोड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

आयरा खानच्या लग्नात आमिर खान भावूक झालेला पाहायला मिळाला. यावेळी एका सोहळ्यात बाबा आपल्या लेकीला गळ्याशी लावून तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसला आहे. आमिर आणि आयरा यांचा हा भावनिक क्षण कॅमेराने अगदी सुंदररित्या टिपला आहे.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

आयरा खानच्या लग्नात आमिर खान भावूक झालेला पाहायला मिळाला. यावेळी एका सोहळ्यात बाबा आपल्या लेकीला गळ्याशी लावून तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसला आहे. आमिर आणि आयरा यांचा हा भावनिक क्षण कॅमेराने अगदी सुंदररित्या टिपला आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज