भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावले असून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी तीन सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येकी १-१ सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौऱ्यातील हा शेवटचा सामना असेल. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ आपल्या मायदेशात परतेल.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने विजय मिळवला होता. तर, एकदिवसीय मालिकेत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. आज टी-२० मालिकेतील निर्णायक सामना खेळला जाणार आहे.