भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने खूप पूर्वीच दुबईत घर विकत घेतले होते. या घराची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.
सानियाने नुकतचे कर्ली टेल्स यूट्यूब चॅनलवर सांगितले की, ती अनेक वर्षांपासून टेनिस खेळत होती. या कारणास्तव, ती दुबईमध्ये फक्त सोयीसाठी राहायची. ती वेळोवेळी भारतात येत-जात असते.
सानिया मिर्झाने तिच्या दुबईतील घराचे इंटीरियर स्वतः डिझाइन केले आहे. सानियाच्या घराच्या बाहेरील भागाचा रंग पांढरा आहे.
सानियाच्या आलीशान घरात महागड्या वस्तूही ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तू घराची शान आणखी वाढवतात.
सानियाच्या लिव्हिंग रूममध्ये एक मोठे डायनिंग टेबल आहे. त्याची किंमत लाखांत आहे. संपूर्ण घराबद्दल बोलायचे झाले तर घराची किंमत कोट्यवधी रुपये आहे. मात्र, नेमकी किंमत कळू शकली नाही.