मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Team India Photos: टीम इंडिया वर्ल्डकप मोहिमेवर रवाना, १५ वर्षांचा दुष्काळ संपणार?

Team India Photos: टीम इंडिया वर्ल्डकप मोहिमेवर रवाना, १५ वर्षांचा दुष्काळ संपणार?

Oct 06, 2022 10:49 AM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Photos- Team India Departs For Australia: T20 विश्वचषकाचा बिगुल १६ ऑक्टोबरपासून वाजणार आहे. प्रत्येक संघ मजबूत तयारीने ऑस्ट्रेलियात पोहोचत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ देखील गुरुवारी पहाटे T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. बीसीसीआयने टीम इंडियाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहेत. दरम्यान, रोहित प्रथमच आयसीसी स्पर्धेत कर्णधारपद भूषवत आहे, पण त्याला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे आणि त्याचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. भारताने २००७ मध्ये पहिला T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पोस्ट केलेल्या या फोटोत कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघाचे १४ खेळाडू दिसत आहेत, तर प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघाचे इतर सपोर्ट दूसऱ्या बाजूला उभे आहेत. या फोटोमध्ये प्रत्येकजण ब्लेझरमध्ये दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

BCCI ने फोटो पोस्ट केल्यानंतर अनेक खेळाडूंनीही त्यांचे फोटो त्यांच्या पर्नसन सोशल मीडिया हॅंडलवरुन शेअर केले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडू तेथील परिस्थितीची सवय करून घेण्याचा प्रयत्न करतील. येथील खेळपट्ट्यांमध्ये भरपूर उसळी आणि वेग आहे, ज्याला हाताळणे नेहमी कठीण जाते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. चहल आणि हर्षल पटेल खराब फॉर्मशी झुंज देत आहेत. तोच विराट बऱ्याच कालावधीनंतर लयीत परतला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात कोहली आपले दुसरे टी-२० शतक झळकावेल, अशी अपेक्षा आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही आपला फोटो शेअर करत विश्वचषक जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान हार्दिक तंदुरुस्त नव्हता. अशा परिस्थितीत त्यावेळी तो भारताच्या पराभवाचा विलन मानला जात होता, पण यावेळी सर्वांना त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

हार्दिकने फिनीशर दिनेश कार्तिकसोबतचाही एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन्ही खेळाडू हसताना दिसत आहेत. कार्तिकसाठी हा विश्वचषक खेळणे हे एखाद्या स्वप्नासारखेच आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी तो भारतीय संघात परतला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

अर्शदीप सिंगनेही आपल्या इन्स्टाग्रामवर स्वताचा फोटो पोस्ट केला आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदीपकडून भारतीय चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. तो सध्या चांगल्या फॉर्मातदेखील आहे. शिवाय डेथ ओव्हर्समध्ये अर्शदीप सुरेख यॉर्कर चेंडू टाकण्यात माहीर आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

रविचंद्रन अश्विनने यावेळी संघातील सपोर्ट स्टाफमधील सहकाऱ्यासोबत फोटो शेअर केला आहे. अश्विन भारताच्या T20 संघाचा बराच काळ नियमित सदस्य नव्हता, पण आता T20 विश्वचषकात त्याला संधी देण्यात आली आहे. गेल्या दोन मालिकांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. आता ऑस्ट्रेलियात त्याच्याकडून मॅचविनिंग गोलंदाजीची अपेक्षा असेल.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

Indian Team Departs For Australia
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

Indian Team Departs For Australia(photos- instagram)

WhatsApp channel

इतर गॅलरीज