मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Acidity Home Remedies: पार्टीत मसालेदार खाल्ल्याने गॅस, छातीत जळजळ होण्याची भीती? आराम मिळवण्यासाठी हा मसाला सोबत ठेवा

Acidity Home Remedies: पार्टीत मसालेदार खाल्ल्याने गॅस, छातीत जळजळ होण्याची भीती? आराम मिळवण्यासाठी हा मसाला सोबत ठेवा

Dec 31, 2023 06:05 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Home Remedies for Acidity: मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना गॅसचा त्रास होतो. नवीन वर्षाच्या पार्टीत असेच मसालेदार खाल्ल्याने छातीत जळजळ, गॅस होण्याची भीती वाटते का? जाणून घ्या काही मसाले जे घरच्या घरी गॅस, छातीत जळजळ दूर करण्याचा एक अतिशय सोपा उपाय आहे.

३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करुन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या पार्टीत एकापेक्षा एक स्वादिष्ट पदार्थ असतात. त्यातही थंडीच्या दिवसामध्ये चविष्ट फूड खाण्याचा मूड सर्वांचाच असतो. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करुन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या पार्टीत एकापेक्षा एक स्वादिष्ट पदार्थ असतात. त्यातही थंडीच्या दिवसामध्ये चविष्ट फूड खाण्याचा मूड सर्वांचाच असतो. (Freepik)

मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना गॅसचा त्रास होतो. पण काही मसाले असे आहेत जे घरच्या घरी ही गॅस, छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करण्याचा एक अतिशय सोपा उपाय आहे. स्वयंपाकघरातील काही मसाले विशिष्ट पद्धतीने वापरले तर खूप उपयुक्त ठरतात. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

दालचिनी - दालचिनी पचनासाठी खूप उपयुक्त आहे. दालचिनी पावडर एक ग्लास पाण्यात किमान २ ते ३ मिनिटे उकळवून ते पाणी प्यायल्यास खूप फायदा होतो. यासाठी तुम्ही दालचिनी पावडर अगोदर बनवून ठेवू शकता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

दालचिनी - दालचिनी पचनासाठी खूप उपयुक्त आहे. दालचिनी पावडर एक ग्लास पाण्यात किमान २ ते ३ मिनिटे उकळवून ते पाणी प्यायल्यास खूप फायदा होतो. यासाठी तुम्ही दालचिनी पावडर अगोदर बनवून ठेवू शकता.

बडीशेपचे पाणी: जर तुम्हाला नियमितपणे पचनाच्या समस्या होत असतील तर सकाळी बडीशेपचे पाणी प्यायल्याने फायदा होईल. बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी प्यायल्यास पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. आठवड्यातून काही दिवस असे केल्याने पोटाच्या सर्व समस्या दूर होतील. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

जिरे- जिरे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. पोटाच्या समस्या, गॅस, उलट्या यावर जिरे फायदेशीर आहे. तापामध्ये सुद्धा लोक जिऱ्याचा विशेष वापर करतात. तुम्ही ५० ग्रॅम जिरे घेऊन त्यात गुळ मिसळून ५ गोळ्या बनवू शकता. बरेच लोक तापाने अस्वस्थ वाटल्यावर याचे सेवन करतात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

लवंग - मळमळ, छातीत जळजळ, गॅसचा त्रास जाणवत असल्यास अनेक जण तोंडात लवंग चघळतात.  तोंडात २ ते ३ लवंगा ठेवून चोखल्याने गॅस, छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होते. (या अहवालातील माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

लवंग - मळमळ, छातीत जळजळ, गॅसचा त्रास जाणवत असल्यास अनेक जण तोंडात लवंग चघळतात.  तोंडात २ ते ३ लवंगा ठेवून चोखल्याने गॅस, छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होते. (या अहवालातील माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)(Freepik)

WhatsApp channel

इतर गॅलरीज