मराठी बातम्या / फोटोगॅलरी / /
Dornier Aircraft : मंदीनं त्रस्त श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात; सागरी गस्तीसाठी दिलं 'हे' खास विमान!
Dornier Aircraft : भारतानं समुद्राचं रक्षण करणारं डॉर्नियर विमान श्रीलंकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक स्थिती पाहता भारतानं श्रीलंकेला केलेली ही मोठी मदत आहे.
Dornier Aircraft : भारतानं समुद्राचं रक्षण करणारं डॉर्नियर विमान श्रीलंकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक स्थिती पाहता भारतानं श्रीलंकेला केलेली ही मोठी मदत आहे.
(1 / 6)
DORNIER AIRCRAFT : गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं आता भारतानं श्रीलंकेला मदत म्हणून समुद्री संरक्षण करण्यासाठी आधुनिक विमानं देण्याचा निर्णय घेतला आहे.(Twitter)
(2 / 6)
डॉर्नियर २२८ हे शॉर्ट टेक ऑफ आणि लँडिंग या प्रकारातील ट्विन-टर्बोड्रॉप युटिलिटी विमान आहे, हे विमान आता भारताकडून श्रीलंकेला देण्यात येणार आहे.(ANI)
(3 / 6)
डॉर्नियर २२८ या विमानात दोन इंजिन असून त्यात एकावेळी १९ प्रवासी बसू शकतात. याशिवाय हे विमान अति उष्ण किंवा जास्त थंड हवामानातही काम करू शकतं.(Twitter)
(4 / 6)
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीनं डॉर्नियर २२८ हे विमान तयार केलेलं आहे. एचएएलनं त्यांच्या कानपूरमधील प्रकल्पात आतापर्यंत अशी १२४ विमानं तयार केली आहे.(Twitter)
(5 / 6)
डॉर्नियर २२८ हे विमान लष्करी वाहतूक, मालवाहतूक, समुद्रावर पाळत ठेवणे, गस्त, वैद्यकीय मदत आणि शोध व बचावकार्य करण्यासाठी वापरलं जातं.(Twitter)
इतर गॅलरीज