Indian Economy: जागतिक मंदी असूनही भारतीय अर्थव्यवस्था 6.9% वाढेल: जागतिक बँक
- इतर देशांच्या तुलनेत भारताला आंतरराष्ट्रीय मंदीचा फार कमी फटका बसला आहे, असे जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे. इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- इतर देशांच्या तुलनेत भारताला आंतरराष्ट्रीय मंदीचा फार कमी फटका बसला आहे, असे जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे. इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
(1 / 6)
जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज सुधारला आहे. नव्या अंदाजामुळे वाढीची शक्यता वाढली आहे.अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ते 6.9% निर्धारित करण्यात आला आहे. यापूर्वी तो 6.5% ने वाढेल असा अंदाज जागतिक बॅकेने व्यक्त केला होता. फाइल फोटो: रॉयटर्स(Reuters)
(2 / 6)
मंगळवारी जागतिक बॅकेने जारी केलेल्या अहवालानुसार, देशाच्या विकासावर कडक आर्थिक धोरण आणि उच्च वस्तूंच्या किमतींचा परिणाम होत आहे. अहवालात या वर्षी सरासरी किरकोळ महागाई ७.१% नोंदवण्यात आली आहे. फाइल फोटो: रॉयटर्स(REUTERS)
(3 / 6)
भारत ही आशिया खंडातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ६.३% वाढली. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार संपूर्ण आर्थिक वर्षासाठी एकूण जीडीपी वाढ ६.८-७% असू शकते. फाइल फोटो: शटरस्टॉक(ShutterStock)
(4 / 6)
जागतिक बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज वाढवला आहे. मात्र, त्याचवेळी पुढील आर्थिक वर्षाचा अंदाज खूपच कमी करण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षाचा प्रारंभिक अंदाज ७ % होता. त्यानंतर तो ६.६% पर्यंत कमी करण्यात आला आहे. फाइल फोटो: पीटीआय(PTI)
(5 / 6)
जागतिक मंदीचा भारतावर इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी परिणाम झाल्याचे जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे. इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फाइल इमेज: ANI(ANI)
इतर गॅलरीज