
संजूने त्याची वर्गमैत्रीण असलेल्या चारुलतासोबतच लग्न केले आहे. २२ डिसेंबर २०१८ रोजी दोघांचे लग्न झाले होते. संजू आणि चारुलता एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासूनच ओळखतात. तिथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली होती.
(sanju samson, instagram)संजूने एकदा त्याच्या लव्हस्टोरी बद्दल खुलासा केला होता. त्याने सांगितले होते, "मी २२ ऑगस्ट २०१३ ला चारुलताला पहिल्यांदा मेसेज केला होता. रात्री ११:११ वाजता मी तिला hi हा मॅसेज पाठवला होता."
(sanju samson, instagram)तसेच, संजू पुढे म्हणाला की, “त्या दिवसापासून मी तब्बल पाच वर्षे चारुसोबत एक फोटो पोस्ट करण्याची वाट पाहत होतो. मला दुनियेला सांगायचे होते की, मी चारुलतावर किती प्रेम करतो. आणि ती माझ्यासाठी किती खास आहे".
(sanju samson, instagram)कॉलेज संपल्यानंतर संजू आणि चारुलता बराच काळ एकमेकांपासून दूर राहिले. यादरम्यान दोघेही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत होते. चारुलताने ह्युमन रिसोर्स या विषयात बीएससी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. चारुला अभ्यासासोबतच गाणी ऐकण्याचीही आवड आहे.
(sanju samson, instagram)दरम्यान, काही दिवस गेल्यानंतर संजूने चारुलताला मेसेज केला होता. त्यावर समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संजू नाराज झाला. चारुलताला भेटण्यासाठी तो थेट तिच्या कॉलेजात पोहोचला होता.
(sanju samson, instagram)त्यानंतर दोघेही डेट करू लागले. पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले.
(sanju samson, instagram)संजूच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केरळकडून खेळतो. तर टीम इंडियासाठी त्याने आतापर्यंत १३ टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १७४ धावा केल्या आहेत.
(sanju samson, instagram)प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर सॅमसनने ५५ सामन्यात ३ हजार १६२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १० शतके आणि १२ अर्धशतके आहेत. त्याचबरोबर संजूने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये १०२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २ हजार ६१० धावा केल्या आहेत. तसेच, त्याने यात १ शतक आणि १४ अर्धशतके केली आहेत.
(sanju samson, instagram)





