
२७ ऑक्टोबर २०२२ रोजी, BCCI ने महिला क्रिकेटपटूंना पुरुषांप्रमाणेच समान मॅच फी देण्याची घोषणा केली. यापूर्वी महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंच्या फीमध्ये मोठी तफावत होती.
(BCCI Women Twitter)पुरुष क्रिकेटपटूंना एका सामन्यात महिलांपेक्षा तिप्पट जास्त मॅच फी मिळायची. पण गेल्या वर्षी बोर्डाच्या या निर्णयानंतर आता महिला क्रिकेटपटूंनाही पुरुषांइतकीच मॅच फी मिळते आहे.
(all photos- BCCI Women Twitter)पुरूष आणि महिलांच्या मॅच फीमध्ये तीन पट फरक होता. भारताच्या वरिष्ठ महिला क्रिकेटपटूंना वन-डेत मॅच पीस म्हणून २० हजार रुपये मिळायचे. जे अंडर-19 पुरुष क्रिकेटपटूंच्या मॅच फीच्या बरोबरीचे होते. तर वरिष्ठ पुरुष संघातील खेळाडूंना वनडेत ६० हजार रुपये मॅच फी म्हणून मिळतात.
याआधी महिला क्रिकेटपटूंना एका कसोटी सामन्यासाठी ४ लाख रुपये म्हणजेच प्रतिदिन १ लाख रुपये दिले जात होते. कारण महिलांची कसोटी फक्त ४ दिवसांची खेळली जाते. तसेच, बीसीसीआय वनडे आणि टी-२० मध्ये महिलांना १ लाख रुपये देत असे.
तर दुसरीकडे, पुरुषांना एका टेस्ट मॅचसाठी १५ लाख म्हणजे दिवसाला ३ लाख रुपये देण्यात येतात. तर वनडेसाठी पुरुषांना ६ लाख तर टी-२० साठी ३ रुपये दिले जातात.
त्याचवेळी, बीसीसीआयने मॅच फीसाठी समान वेतन लागू केल्यानंतर आता महिलांना पुरुषांच्या समान वेतन मिळते. म्हणजेच, महिला क्रिकेटपटूंनाही आता कसोटीसाठी १५ लाख रुपये, वनडेसाठी ६ लाख रुपये आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ३ लाख रुपये दिले जातात.
बीसीसीआयने फक्त महिलांना समान मॅच फी देण्याची घोषणा केली होती. पण सेंट्रल कराराच्या रकमेत कोणताही बदल झालेला नाही. जर आपण महिला आणि पुरुषांच्या सेंट्रल कराराची यादी पाहिली तर दोघांमध्ये खूप फरक आहे.





