Irfan Pathan Wife Safa Baig: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इरफान खानने शेअर केलेल्या या फोटोमध्ये सफा बेगचा चेहरा त्याने पहिल्यांदाच रिव्हील केला आहे.
(1 / 5)
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने पत्नी सफा बेगसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पहिल्यांदाच इरफान खानने आपल्या पत्नीचा चेहरा दाखवला आहे. या आधी नेहमी सफा बुरखा घालूनच दिसली होती.
(2 / 5)
मात्र, आता लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इरफान खानने शेअर केलेल्या या फोटोमध्ये सफा बेगचा चेहरा त्याने पहिल्यांदाच रिव्हील केला आहे. इरफान खानची पत्नी सफा बेग खूपच सुंदर दिसते. सौंदर्याच्या बाबतीत तिने बॉलिवूड अभिनेत्रींना देखील टक्कर दिली आहे.
(3 / 5)
इरफान आणि सफा यांनी २०१६मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. इरफान आणि सफाचा निकाह मक्का येथे झाला होता.
(4 / 5)
इरफान खान याने पत्नी सफा बेगचा फोटो शेअर करताच आता बॉलिवूडकर देखील यावर प्रतिक्रिया देऊन दोघांना शुभेच्छा देत आहेत. सुनील शेट्टी, वत्सल सेठ, युविका चौधरी, रितेश देशमुख यांनी कमेंट करून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
(5 / 5)
इरफान खानची पत्नी सफा बेग ही दिसायला खूपच सुंदर आहे. या आधी ती एक प्रसिद्ध मॉडेल होती. तिने अनेक फॅशन मासिकांसाठी काम केले आहे. सफा इरफानपेक्षा तब्बल १० वर्षांनी लहान आहे.