Pune Army Day : पुण्यात 'आर्मी डे' निमित्त लष्कराचे शक्ती प्रदर्शन, पाहा फोटो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune Army Day : पुण्यात 'आर्मी डे' निमित्त लष्कराचे शक्ती प्रदर्शन, पाहा फोटो

Pune Army Day : पुण्यात 'आर्मी डे' निमित्त लष्कराचे शक्ती प्रदर्शन, पाहा फोटो

Pune Army Day : पुण्यात 'आर्मी डे' निमित्त लष्कराचे शक्ती प्रदर्शन, पाहा फोटो

Jan 15, 2025 02:50 PM IST
  • twitter
  • twitter
  • Pune Army Day: पुण्यात आज भारतीय लष्कराचा ७७ वा 'आर्मी डे' मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी जवानांनी केलेल्या दिमाखदार संचलनाने पुणेकरांची मने जिंकली.
पुण्यात आज भारतीय लष्कराचा ७७ वा 'आर्मी डे' मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी जवानांनी केलेल्या दिमाखदार संचलनाने पुणेकरांची मने जिंकली.
twitterfacebook
share
(1 / 14)

भारताचा सेना दिवस (किंवा लष्कर दिवस) हा दरवर्षी १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. लेफ्टनंट जनरल कोडंदेरा एम. करिअप्पा (नंतर ते फील्ड मार्शल बनले) यांनी जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडून १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल हा साजरा केला जातो. 
twitterfacebook
share
(2 / 14)

हा सोहळा  पुण्यात 'बीईजी ग्रुप अँड सेंटर' (बॉम्बे सॅपर्स) येथे पार पडला.  या पूर्वी बेंगळुरूमध्ये, लखनौत आणि आता तिसऱ्यांदा हा सोहळा पुण्यात पार पडला.  
twitterfacebook
share
(3 / 14)

यापूर्वी आर्मी डे परेड ही दिल्ली येथे साजरी होत होती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हा सोहळा राजधानी बाहेर होत आहे.
twitterfacebook
share
(4 / 14)

आज पुण्यात झालेल्या परेडचे प्रमुख पाहुणे म्हणून लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित होते. लष्कराच्या विविध तुकड्यांनी त्यांना सलामी दिली. हा गौरवशाली सोहळा देशाच्या इतर भागात देखील व्हावा अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार गेल्या तीन वर्षांपासून हा सोहळा देशातील इतर शहरात साजरा होत आहे.
twitterfacebook
share
(5 / 14)

महिला मिलिटरी पोलिसांचे अग्निवीर पथक प्रथमच पुण्यात झालेल्या संचलनात सहभागी झाले. यासोबतच  राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र बटालियनची तुकडी देखील या संचलनात सहभागी झाली.
twitterfacebook
share
(6 / 14)

या संचलनात 'के-९ वज्र' ही 'हॉवित्झर' तोफ, 'बीएमपी दोन शरथ' हे जवानांना वाहून नेणारे चिलखती वाहन, शत्रूला धडकी भरवणारा 'टी ९०' रणगाडा, शस्त्रांचा, प्रामुख्याने तोफांचा शोध घेणारे 'स्वाती' रडार, 'पिनाका' ही क्षेपणास्त्र यंत्रणा, बर्फ, दलदल, पाणी अशा कुठल्याही भूभागात वापरता येऊ शकणारे 'अॅटॉर एन १२००' हे चिलखती वाहन, ड्रोन जॅमर यंत्रणा, मोबाइल दळणवळण यंत्रणाही या संचलनात सहभागी होत त्यांनी लष्कराच्या ताकदीचे दर्शन घडवले.
twitterfacebook
share
(7 / 14)

आर्मी सर्व्हिस कोअरची तुकडी, मराठा लाइट इन्फंट्रीची तुकडी, आर्मी ऑर्डिनन्स कोअरची तुकडी, मेकॅनाइज्ड इन्फंट्रीची तुकडी, मद्रास रेजिमेंटची तुकडी आणि बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप अँड सेंटरच्यावतुकडीने या संचलनाला रंगत आणत लष्कराच्या शिस्तीचे दर्शन घडवले.
twitterfacebook
share
(8 / 14)

लष्कराच्या घोडदळ पथकाने देखील या संचलनात सहभाग घेतला. संपूर्ण जगात घोडदळ असणाऱ्या लष्करात भारतीय लष्कराचा समावेश होतो. 
twitterfacebook
share
(9 / 14)

'रोबोटिक म्युल्स' हे या संचलनाचे प्रमुख आकर्षण ठरले.  या म्युल्सने आर्मीचीफ यांना सलामी दिली. हे म्युल्स १५ किलोपर्यंतचे वजन वाहू शकणारे, कुठेही चढू-उतरू शकणारे आणि उणे ४० अंश सेल्सियस ते कमाल ५५ अंश सेल्सियस तापमानात सहज काम करू शकणारे 'मल्टि युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट्स' अर्थात 'रोबोटिक म्युल्स' प्रामुख्याने टेहळणी व सामग्री वितरणासाठी वापरले जातात.
twitterfacebook
share
(10 / 14)

नेपाळ लष्कराच्या बँड पथक यावेळी सर्वांचे आकर्षण ठरले. जय हो, कदम कदम बढायेजा आदी गाणी त्यांनी वाद्यावर मधुर सुरात वाजवली. याला उपस्थित नागरिकांनी दाद दिली. 
twitterfacebook
share
(11 / 14)

लष्कर प्रमुख द्विवेदी यांच्या हस्ते  लष्करात शौर्य गाजवणाऱ्या व विशेष कामगिरी करणाऱ्या जवानांना शौर्य पदके,  सेना पदके  बहाल करण्यात आली.
twitterfacebook
share
(12 / 14)

लष्कराच्या स्पेशल फोर्स युनिटच्या कमांडो यांनी देखी या संचाल सोहळ्यात सहभाग घेतला होता.
twitterfacebook
share
(13 / 14)

लष्कराच्या स्पेशल फोर्स युनिटच्या कमांडो यांनी देखी या संचाल सोहळ्यात सहभाग घेतला होता.

कॅप्टन संध्या महला यांच्या नेतृत्वात महिला मिलिटरी पोलिसांमधील अग्निवीर महिलांचे पथक या संचलनात पहिल्यांदा सहभागी झाले होते. गेल्या वर्षी कॅप्टन संध्या यांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात तिन्ही दलांमधील महिला सैनिकांच्या पथकाचे नेतृत्व केले होते. कॅप्टन संध्या या 'एनसीसी'च्या माजी छात्र आहेत. 'एनसीसी'च्या छात्र म्हणून त्यांनी २०१७ च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभाग घेतला होता. त्यांचे वडील सुभेदार के. आर. महला यांनी ३८ वर्षे लष्करात सेवा बजावली. त्यांच्या प्रेरणेतून संध्या या लष्करात दाखल झाल्या आहेत.
twitterfacebook
share
(14 / 14)

इतर गॅलरीज