महाड येथे काल महाविकास आघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. ही घटना ताजी असतांना आज लष्कराच्या हेलिकॉप्टरचा देखील अपघात होता होता टळला. हेलिकॉप्टरच्या पायलतने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टरचे एका शेतात लँड केले.
लष्कराचे हे हेलिकॉप्टर सांगली जिल्ह्यातील एरंडोली येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैमानिकाच्या हुशारीमुळे कुणालाही काही झाले नाही.
या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. ही बाब पायलटच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने हे लिकॉप्टर मिरज तालुक्यातील एका शेतात लँड केले. हेलिकॉप्टरचा आवाज आल्याने तसेच ते हवेत हेलकावे खात असल्याचे काही ग्रामस्थांनी पहिले.
ग्रामस्थांनी हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी लँड झाले त्या ठिकाणी धाव घेतली. एका शेतात हे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे लँड करण्यात आले होते. त्या ठिकाणी वैमानिक देखील होते. हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.