भारतीय हवाईदलातर्फे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे आयोजित दोन दिवसीय एयरशो ची रविवारी सांगता झाली. या शो च्या दुसऱ्या दिवशी ही सूर्यकिरण विमाने आणि सारंग हेलिकॉप्टर द्वारे चित्तथरारक कसरती करण्यात आल्या.
सोहण्याचे खास आकर्षण ठरले ते सुखोई ३० विमाने. या विमानांनी पुण्याहून उड्डाण घेत तब्बल २००० हजार प्रतीतास वेगाने उड्डाण करत केवळ २ ते ३ मिनिटांत मुंबई गाठले.
'सुखोई ३० एमकेआय' या विमानाने ताशी दोन हजार किलोमीटर वेगाने पुण्याच्या लोहगाव हवाई तळावरून अलिबागमार्गे तीन मिनिटांत मरीन ड्राइव्ह गाठून दक्षिण मुंबईतील आकाशात १० मिनिटे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
या एअर शोची सुरुवात हवाई दलाच्या कमांडोंच्या 'आकाशगंगा' पथकाने जवळपास १५ हजार फूट उंचीवरून 'सी-१३० सुपर हर्क्युलस' विमानातून पॅराशूटच्या साह्याने उडी मारली.
सुखोईसह प्रशिक्षणार्थी लढाऊ विमानांचा समावेश असलेले 'सूर्यकिरण' पथक, 'सारंग' हेलिकॉप्टर पथक यांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी मुंबईकरांनी रविवारी अलोट गर्दी केली.
दरम्यान, सारंग' या पथकातील 'एएलएच' हेलिकॉप्टरने कुलाब्यातील 'आयएनएस शिक्रा' येथून हवेत झेप घेत काही क्षणात मरीन ड्राइव्हवर येत हवाई कसरती सुरू केल्या.
'सूर्यकिरण' पथकाचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन जी. एस. धिल्लो यांनी केले. 'सारंग' तुकडीचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन एस. के. मिश्रा यांनी केले.