मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  India-Maldives Diplomatic Row : भारत-मालदीव मधील वादाचे नेमके कारण काय? लक्षद्वीप अचानक चर्चेत कसे आले, वाचा सविस्तर

India-Maldives Diplomatic Row : भारत-मालदीव मधील वादाचे नेमके कारण काय? लक्षद्वीप अचानक चर्चेत कसे आले, वाचा सविस्तर

Jan 10, 2024 06:14 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • India-Maldives Row : पंतप्रधान मोदी यांच्यावर करण्यात आलेले आक्षेपार्ह विधानामुळे दोन्ही देशाचे संबंध  ताणले गेले आहेत. मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू हे भारतविरोधी आहे. दरम्यान, मोदी यांनी लक्षद्वीप येथे भेट दिल्यानंतर मालदिवच्या मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून हा वाद सुरू झाला आहे.

लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर अनेक फोटो शेअर करत भारतीय नागरिकांना देशातील पर्यटन स्थळांना सर्वाधिक भेटी देण्याचे आवाहन  केले. त्यांच्या या पोस्टवरुन मालदिवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह विधाने केली. यामुळे अनेक भारतीय संतापले असून त्यांनी ट्विटरवर बॉयकॉट मालदिव ही मोहीम सुरू केली. तर अनेक भारतीयांनी मालदिवचा दौरा रद्द करत काढलेली तिकिटे रद्द केली आहे.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर अनेक फोटो शेअर करत भारतीय नागरिकांना देशातील पर्यटन स्थळांना सर्वाधिक भेटी देण्याचे आवाहन  केले. त्यांच्या या पोस्टवरुन मालदिवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह विधाने केली. यामुळे अनेक भारतीय संतापले असून त्यांनी ट्विटरवर बॉयकॉट मालदिव ही मोहीम सुरू केली. तर अनेक भारतीयांनी मालदिवचा दौरा रद्द करत काढलेली तिकिटे रद्द केली आहे.  (PTI)

मालदवीच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाब केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मालदिव बाबत भारतात संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी 'X' वर लोकांना मालदीवमध्ये प्रवास करण्याऐवजी देशांतर्गत पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे आवाहन केले आहे.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

मालदवीच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाब केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मालदिव बाबत भारतात संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी 'X' वर लोकांना मालदीवमध्ये प्रवास करण्याऐवजी देशांतर्गत पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे आवाहन केले आहे.  (Instagram)

एका निवेदनात, मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, सरकार परदेशी नेत्यांच्या विरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर "अपमानजनक टिपण्णी" बद्दल जागरूक आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

एका निवेदनात, मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, सरकार परदेशी नेत्यांच्या विरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर "अपमानजनक टिपण्णी" बद्दल जागरूक आहेत. (X)

मालदीव सरकारने रविवारी तीन उपमंत्र्यांना पंतप्रधान मोदींविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट केल्याबद्दल निलंबित केले. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

मालदीव सरकारने रविवारी तीन उपमंत्र्यांना पंतप्रधान मोदींविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट केल्याबद्दल निलंबित केले. 

मालदीवच्या प्रमुख राजकीय नेत्यांनी वादावर मुइझ्झू सरकारची निंदा केली. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

मालदीवच्या प्रमुख राजकीय नेत्यांनी वादावर मुइझ्झू सरकारची निंदा केली. (AP)

बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अक्षय कुमार, तसेच क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनी रविवारी लोकांना "भारतीय बेटे" आणि किनारपट्टीला भेटी देण्याचे आवाहन  केले.  
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अक्षय कुमार, तसेच क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनी रविवारी लोकांना "भारतीय बेटे" आणि किनारपट्टीला भेटी देण्याचे आवाहन  केले.  

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि प्रथम महिला साजिधा मोहम्मद सोमवारी पाच दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत.  
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि प्रथम महिला साजिधा मोहम्मद सोमवारी पाच दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत.  (PTI)

काही भारतीय नागरिकांनी त्यांची  मालदीवमधील  नियोजित दौरा या वादामुळे रद्द केला आहे. या बाबत त्यांनी सोशल मिडियावर ट्विट देखील केले आहे.  
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

काही भारतीय नागरिकांनी त्यांची  मालदीवमधील  नियोजित दौरा या वादामुळे रद्द केला आहे. या बाबत त्यांनी सोशल मिडियावर ट्विट देखील केले आहे.  

WhatsApp channel

इतर गॅलरीज