२९ जून हा सर्व भारतीयांसाठी भावनिक दिवस होता. भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक ट्रॉफी घरी आणला आहे. भारतीय संघाच्या शानदार विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. बॉलिवूड स्टार्सनीही टीम इंडियाच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चला तर, मग बघूया बॉलिवूडचे स्टार्स काय म्हणाले…
काजोलने टीम इंडियाचा तिच्या एक्स हँडलवर टीम इंडियाचा ग्रुप हग करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करताना तिने लिहिले की, ‘मी अजूनही मोठ्याने ओरडत आहे आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू कमी होत नाहीय. टीम इंडियाचा अभिमान वाटत आहे. या सामन्यात अनेक वीरांनी चांगली कामगिरी केली.’
बीसीसीआयची पोस्ट रिशेअर करताना अनिल कपूर यांनी लिहिले की, ‘यावेळी प्रत्येक भारतीयाला एक सारखीच भावना आहे.’ यासोबतच त्याने टीम इंडियाला खरे चॅम्पियन म्हटले आहे.
‘सिंघम’ अभिनेता अजय देवगणने टीम इंडियाला पोस्टकरून शुभेच्छा देताना लिहिले की, ‘हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. अभिनंदन टीम इंडिया, तुम्ही इतिहास रचला आहे. आमच्या हृदयात विजयाची नोंद झाली आहे.’
सनी देओलने दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत टीम इंडिया दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ट्रॉफी हातात घेऊन दिसत आहे. त्याने लिहिले की, ‘टीम इंडियाचे अभिनंदन! आज तुम्ही हृदय, कप आणि आनंद जिंकला आहे.’
बोमन इराणी यांनी लिहिले की, ‘मी जवळजवळ दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी अभिनंदन पत्र लिहिणार होतो. मग हा ड्रामा. हा भारताचा मोठा विजय आहे! हे फक्त फायनलमध्येच होऊ शकते!’