भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन वेळा अंडर १९ वर्ल्डकपची फायनल झाली आहे. या दोन्ही वेळा भारताने बाजी मारली आहे. भारताने आतापर्यंत ५ वेळा अंडर १९ वर्ल्डकप जिंकला आहे.
अंडर १९ वर्ल्डकप २०२४ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा थरारक सामन्यात धुव्वा उडवला. तर पहिल्या सेमी फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनल गाठली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल अतिशय रोमांचक होईल, अशी अपेक्षा आहे. कारण दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत अतिशय सुरेख प्रदर्शन केले आहे. भारत ९व्यांदा अंंडर १९ वर्ल्डकपच्या फायनल खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियन संघ १९८८, २००२ आणि २०१० चा अंडर-१९ वर्ल्ड चॅम्पियन आहे. तर भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये अंडर १९ वर्ल्डकप जिंकला होता. तसेच, २००६, २०१६ आणि २०२० मध्ये टीम इंडिया उपविजेता होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१२ मध्ये पहिल्यांदा अंडर १९ वर्ल्डकपची फायनल झाली होती. त्या सामन्यात भारताने कांगारुंचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला होता.